28 एप्रिल ते 1 मे दरम्यान Nitin Desai यांच्या ND Studio मध्ये रंगणार महाउत्सव; होणार महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन

कोविड नंतरच्या युगाचे स्वागत करण्यासाठी अशा रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सगळ्यांनीच साक्षीदार व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ND Film Studio (संग्रहित संपादित प्रतिमा)

चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) एका नव्या उपक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कर्जत येथील 52 एकरमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण एनडी फिल्म स्टुडिओमध्ये (ND Film Studio) महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि वारसा जगासमोर आणण्यासाठी एका महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाउत्सवात भारतरत्न लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान आयोजित हा महाउत्सव नावाप्रमाणेच महाउत्सव असणार आहे.

या महाउत्सवात कला, संस्कृती, नाटक, चित्रपट आणि खाद्यपदार्थांसोबतच कार्यशाळा, फॅशन शोचेही आयोजन करण्यात येणार आहे. हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, 1942 - अ लव्ह स्टोरी, जोधा अकबर, परिंदा, खामोशी अशा कल्ट चित्रपटांचे कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांची दोन दशकांहून अधिक काळ गाजलेली कारकीर्द आहे. अलिकडच्या काळातील स्लम़ॉग मिलेनियर- सच अ लआंग जर्नी आणि प्रेम रतन धन पायो हे त्यांचे गाजलेले चित्रपट. (हेही वाचा: BEST आता 100% इलेक्ट्रिक; 'चलो ॲप' किंवा 'चलो बसकार्ड' द्वारे प्रवाशांना मिळणार डिजीटल सेवा; आदित्य ठाकरे यांची घोषणा)

त्यांचा हा इतिहास पाहाता या महाउत्सवात टिन्सेल टाऊनची चमक नक्कीच दिसेल यात शंका नाही. आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, सूरज आर. बडजात्या, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी अशा नामवंत आणि दिग्गज दिग्दर्शकांसोबत नितीन देसाई यांनी काम केलेले आहे. एनडी स्टुडियोतील महाउत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला दिलेली उजळणी आहे. कोविड नंतरच्या युगाचे स्वागत करण्यासाठी अशा रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सगळ्यांनीच साक्षीदार व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now