पंढरपूर च्या विठ्ठल मंदिरात भाविकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय रद्द
पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनासाठी (Pandharpur VItthal Mandir) येणा-या भाविकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुप्पट वेगाने डोकं वर काढलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणी वर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनासाठी (Pandharpur VItthal Mandir) येणा-या भाविकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय वादग्रस ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हा निर्णय रद्द केला आहे.
देशातील कोणत्याही मंदिरात अशी चाचणी घेतली जात नसल्याने प्रशासनाने आता या भूमिकेपासून यु टर्न घेतला आहे. यातच मग विठ्ठल मंदिरात कोरोना चाचणी सुरू केली तर सर्वच धर्मियांच्या प्रार्थना स्थळात अशी चाचणी का नको? अशी भूमिका पुढे आल्याने प्रशासनाने हा निर्णय रद्द केला आहे.हेदेखील वाचा- पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात दर्शनापूर्वी Covid-19 Test अनिवार्य
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येणा-या भाविकांची रॅपिड टेस्ट करुनच मंदिरात सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. उद्यापासून या तपासण्या सुरू करण्याची प्रशासनाची तयारी असतानाच याबाबत वाद सुरू झाल्याने हा निर्णय तातडीने रद्द करण्यात आला आहे. ही चाचणी अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नव्हती यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर होता. आधीच लॉकडाऊनचा फटका या मंदिराच्या उत्पन्नात तसेच येथील व्यापारी आणि दुकानदारांना बसला आहे. त्यातून सावरतो न सावरतो तोच या रॅपिड टेस्टच्या निर्णयामुळे परत भाविकांची संख्या कमी होईल. परिणामी त्याचा फटका येथील लोकांना बसेल. म्हणून येथील स्थानिकांच्या रोषापायी हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काल (3 एप्रिल) कोरोना विषाणूच्या 49,447 रुग्णांची व 277 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर काल राज्यात 37,821 रुग्ण बरे झाले आहेत. सध्यात राज्यात 4,01,172 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 24,95,315 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 55,656 वर पोहोचली आहे.