Malvani Malad Building Collapsed Update: मुंबईत मालवणी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, 7 जण जखमी
मालवणी मालाड येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दुमजली इमारत बाजूच्या इमारतीवर कोसळली. यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेतीच माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
Malvani Malad Building Collapsed Update: मुंबईत (Mumbai) काल पावसाने दमदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान काल रात्री(9 जून) मुंबईच्या मालवणी मालाड (Malvani Malad) परिसरात दुमजली इमारत कोसळल्याची घटना देखील घडली आहे. या दुर्घटनेत आता आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मृतांचा आकडा 11 वर पोहोचला असून जखमींची संख्या 7 वर पोहोचली आहे. दरम्यान सदर दुर्घटनेत 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे अशी माहिती मिळत आहे.
मालवणी मालाड येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दुमजली इमारत बाजूच्या इमारतीवर कोसळली. यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेतीच माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.हेदेखील वाचा- Rains in Mumbai: मुंबईत मालवणी येथे दुमजली इमारत कोसळली; अग्निशमन दलाकडून मदत-बचाव कार्य सुरु
Maharashtra: Search and rescue operation continues in New Collector compound, Malad West of Mumbai, where residential structures collapsed last night. 11 people died, 7 injured.
Visuals from the spot, this morning. pic.twitter.com/ct7HhErNHF
— ANI (@ANI) June 10, 2021
या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्य सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कशी घडली याबाबत पोलिस तपास करत आहेत.तसेच या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.
बुधवारी (9 जुलै) दिवसभर पावसाचा कहर पाहायला मळाला. प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहिल्याच दिवशी पावसाने मुसळदार आगमन केल्याने मुंबईकरांची त्रेधातीरपीट तर उडालीच. परंतू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. प्रामुख्याने सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता आदी ठिकाणी मुंबई तुंबल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकल सेवा थांबली. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आल्याने रेल्वेसेवा थांबविण्यावाचून पर्याय नव्हता. रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली. प्रामुख्याने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2021 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

