Weather Forecast & Temperature Of Maharashtra: राज्यातील गारठा गायब, तापमानात वाढ; अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याची चाहूल
थंडीचा कडाका (Cold) काहीसा कमी होऊन आता उन्हाचे (Temperature) चटके चांगलेच वाढू लागले आहेत. आकाशात निरभ्र आणि हवामान कोरडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तापमान (Temperature Of Maharashtra) वाढू लागल्याचे पुणे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील हवामानात (Weather Forecast Of Maharashtra) मोठे बदल होऊ लागले आहेत. थंडीचा कडाका (Cold) काहीसा कमी होऊन आता उन्हाचे (Temperature) चटके चांगलेच वाढू लागले आहेत. आकाशात निरभ्र आणि हवामान कोरडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तापमान (Temperature Of Maharashtra) वाढू लागल्याचे पुणे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढचे तीन-ते चार दिवस राज्यातील तापमानात अशीच वाढ आणि कोरडे वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलामुळे रात्रीच्या वेळी पडणारी थंडी जवळपास संपल्याचे जाणवते. शिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 2 अंशांनी वाढल्याचे पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी तर तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वर गेल्याचे पाहायला मिळते.
साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाळा सुरु झाल्याचे संकेत मिळू लागलात. वातावरणातील कोरडेपणा आणि निरभ्र आकाश यांमुळे उन्हाचे चटके अधिक मोठ्या प्रमाणावर बसत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढचे काही काळ हे वातावरण कायम पाहायला मिळेल. वातावरणात बदल होऊन उन्हाचे चटके वाढल्याने अनेकांना उन्हाळा सुरु झाल्यासाहखे वाटत आहे. मात्र, पुढच्या काही काळात हवामानातील कोरडेपणा कमी झाल्यास उन्हाचे चटके आणि तापमानही कमी होऊ शकते. (हेही वाचा, Weather Alert : राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता, उन्हाळ्याची चाहूल)
प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमान 2 अंश सेल्सियसने वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंश सेल्सीअसच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी आढळणारा गारवा बराच कमी झाला आहे. पुढचे काही दिवस ही स्थिती अशीच पाहायाल मिळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.