पुणे: तळेगाव एमआयडीसीला जोडणारा आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला आहे. कारण, ही घटना होण्याअगोदरच या पूलावरून एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणारी बस गेली होती. हा पूल सुमारे 50 वर्ष जुना आहे.

Indrayani River Bridge Representative Image (PC-Twitter)

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीला जोडणारा आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पूल (Indrayani River Bridge Collapsed) आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास कोसळला. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला आहे. कारण, ही घटना होण्याअगोदरच या पूलावरून एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणारी बस गेली होती. हा पूल सुमारे 50 वर्ष जुना आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून तो अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

परंतु, तळेगावकडून एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी हा सर्वात जुना मार्ग असल्याने अवजड वाहनचालक या मार्गाचा वापर करीत असतं. आज सकाळी या पूलावरून दहा-बारा बस गेल्या. त्यानंतर काही वेळातच पूलाचा मधील भाग कोसळला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या पूलाकडे जाणारी वाहतूक बंद केली. (हेही वाचा - Fact Check: सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरचा टाकळी पूल भीमा नदीत कोसळला? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य)

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याची घटना 2016 मध्ये घडली होती. या दुर्घटनेत पुलावरून जाणाऱ्या 2 एसटी बसेससह 7 ते 8 वाहने वाहून गेली होती. यात मोठी जीवितहाणी झाली होती. यानंतर ऑगस्ट 2016 रोजी राज्यातील काही जुन्या पूलांची तपासणी करण्यात आली होती. यात या पूलाचा समावेश होता. त्यावेळी हा पूल वाहतुकीस योग्य असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, आज सकाळी या पूलाचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी जाली नाही.