शिवसेना खासदार संजय राऊत यांना कुख्यात गुंड दाऊतच्या टोळीचा सदस्य असल्याचे सांगून धमक्यांचे फोन करणा-या आरोपीस कोलकाता येथून अटक

14 सप्टेंबरला या आरोपीस कोर्टासमोर हजर केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे

Sanjay Raut And man who threatened him (Photo Credits: Twitter)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कुख्यात गुंड दाऊत इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या नावाने धमक्यांचे फोन करणा-या एका आरोपीस कोलकाता (Kolkata) येथून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने ही माहिती दिली आहे. या आरोपीने मी कुख्यात गुंड दाऊतच्या टोळीचा सदस्य आहे असे सांगून संजय राऊतांना धमक्यांचे फोन केले होते. या प्रकरणाची अधिक चौकशी करताना संजय राऊतांना धमक्यांचे कॉल करणारा हा आरोपी कोलकाता येथील असल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार त्याचा कॉल ट्रेस करुन त्याला अटक करण्यात आल्याचे डीसीपी विक्रम देशमाने (Vikram Deshmane) यांनी दिली आहे.

आतापर्यंत केलेल्या तपासानुसार अन्य राजकारण्यांना धमक्यांचे फोन करणारा हाच व्यक्ती असावा असा संशय पोलिसांना आहे. 14 सप्टेंबरला या आरोपीस कोर्टासमोर हजर केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. Man Arrested for Threatening Sanjay Raut: कंगना रनौत च्या नावाने संजय राऊत यांना कॉल करुन धमकावल्याप्रकरणी एकाला पोलिसांकडून अटक

दरम्यान काल (11 सप्टेंबर) ला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना कंगना हिच्या नावाने फोन करुन धमकावणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पलाश बोस असे आरोपीचे नाव असून टॉलीगंज मधील कोलकाता मधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. बोस याने कंगना रनौत हिचे नाव वापरुन शिवसेना नेते संजय राऊत यांना इंटरनेट कॉलवरुन धमकावल्याच्या प्रकरणी त्याला गुरुवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली आहे.