Irani Bakery Mumbai: 100 वर्षे जुनी इराणी बेकरी रविवारी होणार बंद, राजेश खन्ना यांचा होता अड्डा
120 वर्षे जुनी इमारत ज्यामध्ये हे इराणी हॉटेल आहे, ती बीएमसी 30 नोव्हेंबरनंतर जमीनदोस्त करेल. सनशाइन बेकरी, रेस्टॉरंट आणि बीअर बार हे जवळपासच राहणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा अड्डा होता, तसेच अभिनेते प्रदिप पटवर्धन आणि राजकारणी प्रमोद नवलकर यांचे ही नियमित येणे जाणे होते.
Mumbai: ठाकूरद्वार, गिरगाव येथील 100 वर्षे जुनी सनशाईन बेकरी रविवारी बंद होणार आहे. 120 वर्षे जुनी इमारत ज्यामध्ये हे इराणी हॉटेल आहे, ती बीएमसी 30 नोव्हेंबरनंतर जमीनदोस्त करेल. सनशाइन बेकरी, रेस्टॉरंट आणि बीअर बार हे जवळपासच राहणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा अड्डा होता, तसेच अभिनेते प्रदिप पटवर्धन आणि राजकारणी प्रमोद नवलकर यांचे ही नियमित येणे जाणे होते. हे इराणी रेस्टॉरंट खीमा पाव, बन मस्का आणि खारी बिस्किटांसाठी ओळखले जाते. सर्व वस्तू घरातच बेक केल्या जातात आणि अगदी जुनी पारंपारिक भट्टीमध्ये बनवल्या जातात. दरम्यान, सी वॉर्डचे कार्यकारी अभियंता आणि पदनिर्देशित अधिकारी अमोल मेश्राम म्हणाले, "ही इमारत सी 1 श्रेणीची जीर्ण इमारत आहे जी वस्तीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर सात व्यावसायिक दुकाने आहेत. Measles Vaccination Drive in Mumbai: मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत गोवर लसीकरण मोहीम
दरम्यान, आता इमारत रिकामी करण्यात आली आहे. दरम्यान, 30 नोव्हेंबरपर्यंत जागा रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही इमारत पाडू." सनशाईन बेकरीच्या मालकांनी सांगितले की, "न्यायालयाने आमचे भाडेकरू हक्क कायम ठेवले आहेत परंतु ट्रस्टने याबाबतची योजना कळवली नाही, असे सनशाईन बेकरीच्या मालकांनी सांगितले आहे. पुनर्बांधणी किंवा नवीन ठिकाणी आमची जागा असणार का? आम्ही नियमितपणे भाडे भरत आहोत. आणि आम्ही येथे चालवतो ते व्यवसाय आमचे उत्पन्नाचे एकमेव स्त्रोत आहेत.
" सनशाईनचे व्यवस्थापक अशोक शेट्टी म्हणाले की, "मी 32 वर्षांपूर्वी येथे वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. मला व्यवस्थापक बनवण्यासाठी मालकांनी माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला आणि मी सर्व कामे हाताळू लागलो, आता बेकरीचे 20-25 कामगार आणि मी पुढील आठवड्यात बेरोजगार होतील. आम्हाला पर्यायी जागा देण्यात आलेली नाही. खरं तर तळमजला बऱ्यापैकी स्थिर आहे, केवळ इमारतीचा वरच्या भागालाच वनस्पतींच्या वाढीमुळे भेगा पडल्या आहेत. भाडेकरू म्हणून इमारतीची दुरुस्ती करणे हे आमचे काम होते. TOI ने एनएम पेटिट चॅरिटी फंडाचे विश्वस्त, घरमालक दिनशॉ पेटिट यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांच्या प्रतिनिधीने ते शहराबाहेर असल्याचे सांगून नकार दिला.