शिर्डी: साईबाबांच्या चरणी देणगी स्वरूप महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्‍या वतीनं देण्यात आली 'Thar'

ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, अँड महिंद्रा उद्योग समूहाने (Mahindra And Mahindra Group) साई चरणी Thar देणगी म्हणून दान केली आहे.

Shirdi Sai Baba And Mahindra Thar (Photo Credits: Wikimedia Commons)

अनलॉकच्या टप्प्यात गेली वर्षभर बंद असलेली महाराष्ट्रातील तीर्थस्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे गेले वर्षभर आपल्या देवाला भेटून वन शकणा-या भाविकांनी तीर्थस्थळांवर गर्दी केली. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही (Shirdi Sai Baba) तेच चित्र पाहायला मिळाले. दरम्यान भाविकांनी आपल्या ऐपतीनुसार देवाच्या चरणी काही ना काही दान करण्याची प्रथा आजही कायम आहे. यातच साई संस्थानाकडून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, अँड महिंद्रा उद्योग समूहाने (Mahindra And Mahindra Group) साई चरणी Thar देणगी म्हणून दान केली आहे.

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्‍या वतीनं तब्बल 8 लाख 34 हजार रुपये किंमतीची थार (Thar) या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात दिली. याप्रसंगी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकारा यांनी संस्‍थानचे प्रमुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्‍याकडे सदर गाडीची चावी सुपूर्त केली.हेदेखील वाचा- पंढरपूर: विठुरायांच्या भक्तांसाठी खुशखबर! आता ऑनलाईन पासाशिवाय भाविकांना घेता येणार विठोबाचे दर्शन, 'हे' असतील महत्त्वाचे नियम

ही देणगी स्वरुप ही गाडी पाहता अनेकांचे डोळे चक्रावले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा ने या गाडीची चावी संस्थानाकडे दिली आहे. याआधी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्‍या वतीने यापूर्वी व्‍हायोजर, बोलेरो, स्‍कॉर्पिओ, कॅम्‍पर, लोगान, झायलो, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्‍टर), एक्‍स यु व्‍ही 500, एक्‍स यु व्‍ही ३००, मराझो अशा विविध श्रेणीतील एकूण14 वाहने देणगी स्‍वरुपात दिलेल्‍या आहेत. त्यात आता महिंद्रा थारचा देखील समावेश झाला आहे.