पाकिस्तानात जाण्यासाठी महिलेने बनावट कागदपत्रांचा केला वापर, गुन्हा दाखल

बनावट पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील 23 वर्षीय महिला कायदेशीर अडचणीत सापडली आहे.

बनावट पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील 23 वर्षीय महिला कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ठाण्यातील नगमा नूर मकसूद अली उर्फ ​​सनम खान असे या महिलेचे नाव असून, तिने कथितपणे तिचे नाव बदलले आणि तिच्याकडे ठाण्यातील लोकमान्य नगर येथून आधार कार्ड, पॅनकार्ड आणि तिच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र मिळाले आहे. वृत्त संस्था पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.  त्यानंतर तिने पासपोर्ट अर्जासोबत ही बनावट कागदपत्रे सादर केली, पोलिसांनी सांगितले की, कागदपत्रांच्या आधारे तिला बनावट पासपोर्ट मिळाला आहे. (हेही वाचा - Mumbai Crime: जुहू परिसरात महिलेसोबत गैरवर्तन, पोलिसांचा तपास सुरु (Watch Video))

बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट मिळवण्यात महिलेला यश आले आणि ती पाकिस्तानला गेली. ही घटना मे 2023 ते यावर्षी मे दरम्यान घडली. आता या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल केला आहे. या दोघांवर भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.