ठाणे: सासरच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांची हत्या करत महिलेने गळफास लावत संपवले आयुष्य

तर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइट नोट लिहून ठेवली होती त्यामुळेच या प्रकरणाचा खुसाला झाला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फाइल फोटो)

ठाणे (Thane) येथील एका विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून पोटच्या दोन मुलांची हत्या करत स्वत: सुद्धा गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइट नोट लिहून ठेवली होती त्यामुळेच या प्रकरणाचा खुसाला झाला आहे. पोलिसांच्या मते नवरा-बायकोमध्ये वाद सुरु होते. तर मुलांच्या ताब्यावरुन गुजरात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण महिलेने आत्महत्या केल्याने कासारवडवली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सीताबेन असे मृत महिलेचे नाव असून तिचा विवाह 7 वर्षांपूर्वी राजेश वाविया याच्या सोबत झाला होता. तर राजेश सीताबेन हिला मानसिक आणि शारिरिक स्वरुपात त्रास देत होता. यामुळे सीताबेन हिने राजेशच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु एक महिन्यापूर्वी सीताबेन तिच्या दोन मुलांना घेऊन भावाच्या घरी राहण्यास आली होती. रविवारी भाऊ काही कारणास्तव घराबाहेर गेला असता सीताबेन हिने तिच्या दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर तिने गळफास लावत आयुष्य संपवले.

सीताबेन हिचा भाऊ संध्याकाळी घरी परतला त्यावेळी बराच वेळ दरवाजा ठोठावला तरीही कोण उघडत नव्हते. त्यामुळे त्याने याबद्दल पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत दरवाजा तोडून आतमध्ये गेले असता त्यांना महिलेच्या मृत देहासह दोन लहान मुलांची हत्या केली असल्याचे कृत्य पाहिले.(मुंबई: पार्क केलेल्या बसमागे लघुशंका करत असलेल्या चालकाला चोर समजत जमावाकडून मारहाण, मृत्यू)

पोलिसांनी याबाबत तातडीने तपास सुरु केला असता त्यांना घरात एक सुसाइट नोट मिळाली. त्यामध्ये सीताबेन हिने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. यामुळे आता सासरच्या मंडळींची पोलिसांकडून अधिक तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.



संबंधित बातम्या