ठाणे: गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने दिली 450 उठाबश्या काढण्याची शिक्षा, गुन्हा दाखल

या प्रकरणी सदर शिक्षिकेच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

ठाणे येथील एका आठ वर्षीय शाळेतील मुलीने गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने 450 उठाबश्या काढण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदर शिक्षिकेच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ती तीसरी मध्ये सध्या शिकते. शुक्रवारी ही घटना घडली असून शिक्षिकेने उठाबश्या काढण्याच्या शिक्षेवरुन मुलीची तब्येत एवढी बिघडली की तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना याबाबत अधिक माहिती देत लता असे शिक्षिकेचे नाव असल्याचे स्पष्च केले आहे. तर गेल्याच महिन्यात या शिक्षिकेने मुलीने गृपाठ केला नव्हता म्हणून कथित रुपात तिचे कपडे काढून तिला वेताच्या काठीने मारले होते.

पोलीस अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, शुक्रवारी गृहपाठ न केल्याने मुलीला 450 उठाबश्या काढण्यास सांगितले. मुलगी शांतिनगर मधील मीरा रोड येथील परिसरात राहते. ट्युशनवरुन घरी आली तेव्हा तिच्या आईने पाहिले असता मुलीला नीट चालता येत नसल्याचे दिसून आले. तसेच मुलीचे दोन्ही पाय सुजले होते. यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.(मुंबई: अपवित्र आत्मा बाहेर काढण्याच्या बहाण्याने 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार; पुजाऱ्याला अटक)

शनिवारी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने तक्रार दाखल करता असे म्हटले आहे की, गेल्या महिन्यात सुद्धा याच शिक्षिकेकडून तिला कडक शिक्षा देत वेताच्या काठीने मारले होते. तेव्हा सुद्धा तिच्या पायांचा सूज आली होती. याबाबत शिक्षिकेला मुलीच्या आईने विचारले असता तिने संताप व्यक्त केला. तक्रार दाखल केल्यानुसार कायदा 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.