Thane: महिला शिक्षकाचा 11 वर्षीय मुलीवर अत्याचार; ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

एका 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा तिच्यावर आरोप आहे. सांगितले जात आहे की, या महिलेने एक 11वर्षांची मुलगी घरकाम (Domestic Help Tortured) करण्यासाठी आणली होती. तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जात होते.

Torture | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

ठाणे पोलिसांनी (Thane Police) एका महिला शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा तिच्यावर आरोप आहे. सांगितले जात आहे की, या महिलेने एक 11वर्षांची मुलगी घरकाम (Domestic Help Tortured) करण्यासाठी आणली होती. तिच्याकडून घरातील सर्व कामे करुन घेतली जात होती. मात्र, तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जात होते. तिला पोटभर जेवण आणि अत्यावश्यक सुवीधाही दिल्या जात नव्हत्या. पीडितेवर होत असलेल्या अमानुष वर्तन आणि अत्याचाराबद्दल शेजारी आणि सोसाटीयतील सफाई कर्मचारी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिची सुटका करण्यात आली. ही घटना ठाणे येथील कापूरबावडी परिसरात घडली.

मुलीला पाईपने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, ठाणे येथील कापूरबावडी परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय महिला शिक्षकाने तिच्या घरकाम करणाऱ्या 11 वर्षीय महिला नोकरावर अमानूष अत्याचार केले. तिला मारहाण करुन जखमी केले. आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीला पाईपने मारहाण केली. पीडितेवर सातत्याने तिच्या मुलाकडे दुर्लक्ष केल्याचा आणि कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप केला जात असे. त्या बदल्यात शिक्षा म्हणून तिला अन्न-पाणी यांपासून वंचित ठेवले जात असे, अशी प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडी प्राप्त माहिती आणि दाखल एफआयआर यानुसार या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, गेल्या डिसेंबरपासून पीडितेसोबत गैरवर्तन सुरु होते. (हेही वाचा, Man Ends Life Hearing Wife's Voice: बायकोचा आवाज ऐकताच पतीची आत्महत्या)

महिला मदतनिसांमुळे अत्याचाराला फुटली वाचा

अधिक माहिती अशी की, पीडिता मुळची दिल्ली येथील आहे. आरोपी महिला तिला सातत्याने घरातच बंदिस्त करुन ठेवत असे. ज्यामुळे तिच्यासोबत नेमके काय होते आहे बाहेरच्या कोणाला हे कळत नसे. दरम्यान, आरोपी महिला राहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये काही महिला साफसफाई आणि मदतनीस म्हणून काम करत असत. त्यांना या मुलीवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारांबाबत कुणकूण लागली. ज्यामुळे त्यांनी अधिक माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार पुढे आला. त्यांनी अपार्टमेंटमधीलच काही रहिवाशांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. (हेही वाचा, Thane Horror: वर्तकनगर भागात 10 वीत शिकणार्‍या मुलावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर फरार)

दरम्यान, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही. अथवा अटकही झाली नाही. कापूरबावडी पोलीसांनी आरोपी महिलेवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, लहान मुलांकडून बेकायदेशीर काम करवून घेणे, बालकामगार ठेवणे, अन्याय, अत्याचार असा विविध आरोपांखाली आरोपी महिलेवर गुन्हा दाखलकेला आहे. दरम्यान, मूळची दिल्लीची असलेली ही मुलगी या महिला शिक्षकाकडे काम करण्यासाठी आलीच कशी याबाबत उकल करणे, पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान असणार आहे.