Thane: महिलेवर अॅसिड हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता तरुण, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या प्रकरणी पोलिसांकडून 38 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Thane: ठाणे येथे रिलेशनशिपसाठी नकार दिल्याने एका महिलेवर कथित रुपात अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न तरुणाकडून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून 38 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. शांति नगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, आरोपी मोहम्मद इकबाल सिंकदर अंसारी असे आरोपीचे नाव आहे.(Mumbai: दोन तरुणांचे अपहरण आणि दरोड्याच्या संशयावरून नग्न परेड केल्याप्रकरणी 2 पोलिसांना अटक)

इकबाल सिंकदर अंसारी हा भिवंडीत मजूराचे काम करतो. त्याचवेळी त्याला एका 20 वर्षीय तरुणीवर प्रेम जडले. परंतु मुलीच्या मनात त्याच्याबद्दल कोणत्याच भावना नव्हत्या असे पोलिसांनी सांगितले आहे.(Maharashtra: पुण्यात चोरट्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने फोडले एटीएम मशीन, पळवली 16 लाखांची रोकड)

अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, 22 डिसेंबरला तरुणीवर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामधून ती बचावली. आरोपीने महिलेच्या वडीलांसोबत ही गैरवर्तन केले आणि त्यांच्या स्कूटरचे ही नुकसान केले. तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन शनिवारी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या विरोधात कलम 354(डी), 326(बी), 506(2),294 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.