Thane Shocker: ठाणे हादरले! महिलेवर बहिणीच्या नवऱ्याकडून बलात्कार; गर्भपात करण्यासही पाडले भाग
ठाणे जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महिला गरोदर झाली. आरोपी मेहुण्याने नंतर महिलेला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Thane Shocker: ठाणे जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार(Rape)केल्याचा आरोप केला आहे. त्याबाबतची तक्रार पीडित महिलेने ठाणे (Thane Shocker)पलिसांत दिली. महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बहिणीच्या नवऱ्या अनेकवेळा तिच्यावर जबरदस्ती केली. 32 वर्षीय मेव्हण्याने 26 जानेवारी रोजी तिच्या बहिणीच्या घरी आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला, असे तक्रारीत म्हटले आहे. (हेही वाचा:Mumbai Shocker: ऑनलाइन गेमने घेतला कॅब ड्रायव्हरचा जीव; खेळातील टास्क पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने मारली Bandra-Worli Sea Link वरून उडी )
मेहुण्याने तिच्यावर गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. ही घटना कोणालाही समजू नये यासाठी आरोपीने पीडित महिलेला मुंब्रा येथील रुग्णालयात नेले आणि तिची गर्भधारणा संपवण्यास भाग पाडले.
एवढेच नाही तर या घटनेची वाच्यता कोठेही न करण्याची धमकी आरोपीने महिलेच्या पालकांना दिली होती. असे ही या महिलेच्या तक्रारीतून उघड झाले आहे. पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहिता कलम 68 (अधिकारी व्यक्तीकडून लैंगिक संबंध) आणि 88 (गर्भपातास कारणीभूत) अंतर्गत एफआयआर नोंदवला. अद्याप मात्र, या घटनेत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2024 11:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

