Thane Shocker: 'मला न्याय हवाय... !' ठाण्यात बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रेयसीला SUV ने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न; पिडीतेने सोशल मिडियावर कथन केली घटना (See Post)
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अश्वजित आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, चार दिवस उलटूनही अश्वजित, रोमिल पाटील, सागर शेळके यांना अटक न झाल्याची माहिती आहे. अनिल गायकवाड यांचे मोठे राजकीय संबंध असल्याने पोलीस अद्याप कोणतीही कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रातील ठाण्यातील (Thane) घोडबंदर रोडवरील ओव्हल कॉम्प्लेक्समध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका बड्या नोकरशहाच्या मुलाने आपल्या प्रेयसीला आपल्या गाडीखाली चिरडले आहे. अश्वजित गायकवाड (Ashwajit Gaikwad) असे या तरुणाचे नाव असून, त्याची पीडित प्रेयसी प्रिया सिंगने आरोप केला आहे की, अश्वजीतने सोमवारी पहाटे तिला त्याच्या एसयूव्हीखाली चिरडले. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेमध्ये पीडितेचा उजवा पाय तुटला असून, तिच्या हातावर, पाठीवर आणि पोटावर जखमा झाल्या आहेत. तिच्यावर सध्या ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रिया सिंगने ही घटना इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यानंतर क्षणार्धात अश्वजित गायकवाड याच्या कथित हिंसक वर्तनाकडे लक्ष वेधणारी पोस्ट व्हायरल झाली. अश्वजीत गायकवाडने मित्रांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा आरोप प्रियाने केला आहे. अश्वजीत गायकवाड हा एमएसआरडीसीचे (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) संचालक अनिल गायकवाड याचा मुलगा आहे.
आपल्या पोस्टमध्ये प्रियाने अश्वजीतचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील आणि सागर शेळके, अश्वजीतचा ड्रायव्हर-सह-बॉडीगार्ड यांची नावेही नमूद केली आहेत. सिंगने तिच्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, शिवसेना-यूबीटीचे आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे.
इंस्टाग्रामवर प्रिया सिंगने संपूर्ण घटना कथन केली आहे. तिने सांगितले की, सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अश्वजीतने तिला कोर्ट यार्ड हॉटेलमध्ये बोलावले. या ठिकाणी तिचे अश्वजीत आणि त्याचा मित्र रोमिलशी भांडण झाले. अश्वजीतच्या मित्रांनी प्रियाला शिवीगाळ केली. त्यानंतर अश्वजीतने प्रियाला थप्पड मारली आणि तिचा गळा दाबला. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्या हाताचा चावा घेतला, तिचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी प्रियाला जमिनीवर ढकलले.
प्रिया पुढे सांगते, त्यानंतर ते सर्वजण आपापल्या गाड्यांकडे जाऊ लागले व त्यांनी तिला कारने धडक दिली. यानंतर प्रियाला तसेच सोडून ते सर्वजण निघून गेले. काही वेळानंतर रस्त्यावरील एका व्यक्तीने प्रियाची मदत केली व पोलिसांना याची माहिती दिली. या दरम्यान अश्वजीतचा ड्रायव्हर परत आला व त्याने प्रियाला घडलेला प्रकार पोलिसांना न सांगण्याबद्दल धमकी दिली. घडलेल्या गोष्टीचा सर्व दोष अश्वजितच्या वतीने आपण घेणार असल्याचेही ड्रायव्हरने सांगितले. रुग्णालयात पोहोचल्यावर प्रियाने तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. (हेही वाचा: Vaishnavi Dhanraj Video: अभिनेत्री वैष्णवी धनराजाचा कुटुंबावर मारहाणीचा आरोप; पोलिस ठाण्यात घेतली धाव)
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अश्वजित आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, चार दिवस उलटूनही अश्वजित, रोमिल पाटील, सागर शेळके यांना अटक न झाल्याची माहिती आहे. अनिल गायकवाड यांचे मोठे राजकीय संबंध असल्याने पोलीस अद्याप कोणतीही कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशीही केली नसल्याचा आरोप आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)