Thane Shocker: ठाण्यात क्षुल्लक कारणावरून फळविक्रेत्याचा दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; पिता-पुत्राला पोलिसांकडून अटक
त्या प्रकरणी त्यांना अचक करण्यात आली आहे.
Thane Shocker: ठाणे जिल्ह्यात केळाच्या वादावरून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रविवारी एका ४४ वर्षीय फळ विक्रेत्याला (Fruit Vendor)आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. पिता-पुत्राने मिळून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार समोर आले आहे. (हेही वाचा:Hoax Call About Blast in McDonald Dadar: दादर च्या McDonald मध्ये स्फोट करण्याचा मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये धमकीचा कॉल)
मंडप डेकोरेटर असलेल्या 27 वर्षीय व्यक्तीने आणि त्याच्या मित्राने शनिवारी भिवंडी शहरात असलेल्या या फळ विक्रेत्यांकडून डझनभर केळी खरेदी केली होती. त्याचे पैसेही त्यांनी भरले होते. मात्र, मंडप डेकोरेटरसोबत आलेल्या त्याच्या मित्राने फळांच्या टोपलीतून आणखी केळे उचलून घेतली. ज्यामुळे फळ विक्रेता आणि त्यांच्याच भांडण झाले, असे नारपोली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ज्या व्यक्तीने केळी उचलली त्याने वाद मिटवण्यासाठी नंतर पैसे देण्याची तयारी दर्शवली. परंतू वाद वाढला ज्यानंतर पिता-पुत्राने त्या दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याशिवाय इथे पुन्हा दिसला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली, असे ते म्हणाले.
पीडितांपैकी एकाच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा दोघा पिता-पुत्र फळविक्रेत्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर नोंदविला. ), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (सामान्य हेतू) अशा कलमांआधारे गुन्हा दाखल केला आहे .