Thane Shocker: केवळ 18 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, नात्यातील 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; ठाणे येथील घटना

एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. नारपोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पत्नीने या संदर्भात तिच्या पतीकडे तक्रार केली असता त्याने तिला धमकी दिल्याचा आरोप आहे.

Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Thane Shocker:  ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध त्याच्या चुलत भावाच्या १८ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी माहिती देताना सोमवारी सांगितले की, पत्नीने या संदर्भात तिच्या पतीकडे तक्रार केली असता त्याने तिला धमकी दिल्याचा आरोप आहे. पत्नीला धमकावल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना ८ मे रोजी भिवंडी परिसरात घडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी रविवारी तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास उशिर का झाला याबाबत एफआयआरमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे देखील वाचा: Amravati Bus Accident:अमरावती जिल्ह्यात खासगी बसचा पुलाखाली कोसळली, ५० प्रवाशी जखमी, बचावकार्य सुरु

अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी तरुणाने कथितरीत्या मुलीला विवस्त्र केल्यानंतर  लैंगिक अत्याचार केला आणि जेव्हा मुलीच्या आईने तिच्या पतीकडे तक्रार केली तेव्हा त्याने आणि आरोपी तरुणाने तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे, रविवारी, भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (महिलेवर अत्याचार करणे किंवा तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने गुन्हेगारी बळाचा वापर करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (सामान्य हेतू) प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंड संहितेच्या विविध कलमांनुसार आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.