Thane Shocker: चेहर्यावर चावा घेतल्याची निशाणी ठाणे पोलिसांना ठरली 17 वर्षीय मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीलाबेड्या ठोकण्यासाठी फायद्याची
ठाण्यात घोडबंदर रोड परिसरात मुलीला छेडल्यानंतर आरोपीच्या हातातून निसटण्यासाठी तिने आरोपीच्या चेहर्यावर चावा घेतला होता.
सार्वजनिक ठिकाणी 17 वर्षीय मुलीला छेडल्याप्रकरणी आरोपीच्या चेहर्यावरील "बाईट" च्या मार्क मुळे पोलिसांना त्याचा छडा लावण्यात यश आलं आहे. दरम्यान ही घटना 11 ऑगस्टची आहे. ठाण्यात घोडबंदर रोड (Thane Ghodbander Road) वर स्काय वॉक वरून जात असताना तिची छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने मुलीला मागून धरलं होतं आणि तिची छेड काढली होती. अशी माहिती वर्तक नगर डिव्हिजनचे असिस्टंट कमिशनर निलेश सोनावणे यांनी दिली आहे.
मुलीने छेडछाडीच्या प्रकारानंतर स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरोपीच्या चेहर्यावर चावा घेतला होता. त्यानंतर ती पोलिस स्टेशन मध्ये पोहचली आणि तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनीही अनोळखी व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक नेटिझन्स कडून महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न विचारण्यात आला होता. पोलिसांनीही कंबर कसून काम करताना आरोपीचा शोध सुरू केला. जवळपास असलेले सीसीटीव्ही फूटेज देखील तपासण्यात आले. पोलिसांकडे केवळ त्याच्या चेहर्यावर चावा घेतल्याची निशाण होती. हे देखील नक्की वाचा: Mumbai: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक .
शनिवारी उशिरा, पोलिसांनी आरोपी दिनेश गौड (33) या व्यक्तीला ताब्यात घेतले. दिनेश मनपाडा मध्ये मनोरमा नगरचा रहिवासी होता. पोलिसांनी त्याला त्या निशाणीवरूनच ओळखलं. आरोपीला अटक केल्यानंतर त्यांच्यावर कलम 354-ए आणि पोक्सो अंतर्गत कारवाई केली आहे.