Kedar Dighe यांना Mumbai Police चा समन्स; बलात्कार पीडीतेला धमकवल्याच्या प्रकरणी होणार चौकशी

या बलात्कार पीडीतेला धमकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी चौकशीसाठी केदार दिघेंना पोलिस स्टेशन मध्ये बोलावण्यात आले आहे.

Kedar Dighe | PC: Facebook

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज विविध घडामोडी घडत आहेत. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांविरूद्ध ठाकले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी ठाण्यात शिवसेनेची ताकद पुन्हा मजबूत करण्यासाठी केदार दिघे यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मिळून काही दिवस उलटताच केदार दिघेंना (Kedar Dighe) आज मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police)  समन्स बजावण्यात आला आहे.

केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप आहे. या बलात्कार पीडीतेला धमकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी चौकशीसाठी केदार दिघेंना पोलिस स्टेशन मध्ये बोलावण्यात आले आहे.

पहा ट्वीट

दरम्यान मुंबईत ना म जोशी मार्ग पोलिस स्टेशन मध्ये बलात्कार पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केदार दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लोअर परळ मधील सेंट रेगीज हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित तरूणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप केला आहे.

केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी होते. मानसपुत्रावत त्यांनी एकनाथ शिंदेंना सांभळलं होतं. एकनाथ शिंदे आनंद दिघेंना आपले राजकीय गुरू मानतात.