ठाणे: सेप्टिक टॅंक मध्ये गुदमरून सफाई कामगारांचा मृत्यू, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा
ठाणे येथील ढोकळी विभागात गुरुवारी, तीन सफाई कामगारांचा सेप्टिक टॅंक मध्ये गुदमरून मृत्यू झाल्या प्रकरणी प्राईड प्रेसिडेन्सी लक्सएरिआ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे
ठाणे (Thane) येथील ढोकाळी (Dhokali) विभागात गुरुवारी, तीन सफाई कामगारांचा सेप्टिक टॅंक (Septic Tank Death) मध्ये गुदमरून मृत्यू झाल्या प्रकरणी संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कापूरबावडी विभागातील पोलिसांनी प्राईड प्रेसिडेन्सी लक्सएरिआ (Prime Presidency Luxeria) या गृहसंकुलाचे समिती सचिव हरभजन सिंग भाटिया, खजिनदार सुनील कैचे यांना अटक केली होती. यासोबतच सोसायटीचे अध्यक्ष सुमन नरसाना यांच्या विरोधात देखील आरोप दाखल करण्यात आला असून सध्या ते शहराबाहेर असल्याने अटक करण्यात आलेली नाही. या आरोपींना तूर्तास न्यायलयीन कोठडी सुनविण्यात आली आहे.
ढोकाळी परिसरातील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया सोसायटीत मध्यरात्रीच्या सुमारास एसटीपी प्लॅन्टची सफाई करताना एकूण 8 कामगार गुदमरले होते. त्यातील तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सोसायटीच्या आवरात एकूण चार टाक्या असून त्यादिवशी तीन टाक्यांची साफसफाई करण्यात येत होती.रात्री उशिरापर्यंत अमित पुन्हाल (20), अमान बदल (21), अजय बुम्बाक (24) हे कामगार टाक्या साफ करत होते मात्र या वेळी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा साहित्यच उपलब्ध नव्हते,असे समोर आले आहे . ठाणे: ढोकाळी येथील सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू; 5 जण जखमी
दरम्यान सेप्टिक टॅन्कच्या साफसफाईचे काम ज्या कंत्राटदाराला सोसायटीने दिले होते, त्याचे हे पहिलेच काम असूनही याबाबत काहीच चौकशी न करता सोसायटीने हलगर्जी दाखवली व यामुळेच कामगारांवर असा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ही घटना घडल्यावर, कंत्राटदाराची निष्काळजी कामगारांच्या जीवावर बेतली असा देखील आरोप करत पोलिसांनी तात्काळ एन्वारकेम इंजिनिअरिंगचे वैभव पाटील आणि जितेंद्र खैर या कंत्राटदरांना अटक करण्यात आली होती.