ठाणे: रेल्वे स्थानकात चहाचे ग्लास धुण्यासाठी वापरला जातोय कचऱ्याचा डब्बा; सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे खळबळ
मंदार अभ्यंकर नामक एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये ठाणे येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील कँटीन जवळच एक व्यक्ती कचऱ्याच्या डब्ब्यात चहाचे ग्लास धूत असल्याचे दिसून आले आहे.
काही महिन्यांपूर्वी कुर्ला (Kurla) रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थ स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या व्हिडीओवरून झालेल्या गोंधळामुळे काहीच दिवसात या स्टॉलवर कारवाई करत रेल्वे कडून टाळं ठोकण्यात आलं होतं, पण याच पाठोपाठ असाच काहीसा प्रकार ठाणे (Thane) रेल्वे स्थानकात देखील समोर आला आहे, मंदार अभ्यंकर नामक एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये ठाणे येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील कँटीन जवळच एक व्यक्ती कचऱ्याच्या डब्ब्यात चहाचे ग्लास धूत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर सर्वात आधी या इसमाने आपली बनियान या डब्यक्त धुतली आणि मग चहाचे ग्लास सुद्धा त्याच पाण्यात बुचकळून काढले असेही समोर आले आहे.
मंदार अभ्यंकर यांनी हा व्हिडीओ मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना देखील टॅग केला आहे. यानंतर रेल्वेनंही या व्हिडीओची दखल घेतल्याचं ट्विट केलं आहे. आता रेल्वे प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Video): रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी बनवण्याचा किळसवाणा प्रकार; दुकानदारावर कारवाई
मंदार अभ्यंकर ट्विट
चहा प्रेमींसाठी एक वाईट बातमी; टपरी वरील चहा आता अजून महागणार Watch Video
मागील काही दिवसांपूर्वी कुर्ला स्थानकात घडलेल्या प्रकरणानंतर रेल्वेकडून सर्व स्थानकांवरील खाद्य दुकानात स्वच्छता आणि पदार्थाचा दर्जा तपासण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर अजूनही अशा प्रकारचे प्रसंग समोर आल्याने रेल्वे कँटीनच्या दर्जावर प्रश्न उगारले जात आहेत.