ठाणे: Coronavirus Lockdown दरम्यान मॉनिंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पोलिसांकडून 'आरती'! (Watch Video)

आज ठाण्यामध्ये अशाच काही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांना पोलिसांनी अडकून त्यांची ' आरती' केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Thane Police | Photo Credits: ANI/ Twitter

महाराष्ट्रात मुंबई सह आजुबाजूच्या उपनगरांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसा गणिक झपाट्याने वाढत आहे. अशामध्ये नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्याव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र तरीही लोकं रस्त्यावर भटकत असताना दिसत आहे. सकाळी प्रामुख्याने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. आज ठाण्यामध्ये अशाच काही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांना पोलिसांनी अडकून त्यांची ' आरती' केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान नागरिकांना रस्त्यावर अनावश्यक गर्दी टाळा यासाठी सर्वतोपरी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यापासून सेलिब्रिटी ते अगदी चिमुकल्यांनीही आवाहन केले आहे. मात्र तरीही जे लोक आज बाहेर पडले त्यांच्यासाठी आता ठाणे पोलिसांनी हा पर्याय निवडला आहे.

दरम्यान पुण्यामध्ये, रत्नागिरीमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या, योगा करणार्‍यांना शिक्षा म्हणून स्थानिक पोलिसांनी रस्त्यावरच सामुहिक सूर्यनमस्कार घालण्यास सांगितलेला व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता त्यापाठोपाठ ठाण्यात अशाप्रकारे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍यांना अद्दल शिकवण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र: लॉकडाउनच्या काळात राज्यात कलम 188 नुसार 57 हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल तर 12123 जणांना अटक.

ANI Tweet 

ठाण्यामध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात 403 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 365 जणांवर उपचार सुरू असून 27 जण कोरोनामुक्त झाले असून 11 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. तर राज्यात  एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4600 च्या पार गेला आहे. मागील दोन दिवसांमध्ये 24 तासात राज्यामध्ये 400हून अधिक रूग्ण आढळल्याने आता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. दरम्यान मुंबईतील स्थिती चिंताजनक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही सांगण्यात आलं आहे. सध्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं खास पथक महाराष्ट्रात दाखल  झालं आहे.