Antigen Tests in Malls: ठाण्यातील मॉल्स सुरु; TMC कडून मॉल्स आणि रेल्वे स्टेशनवर Antigen Testing

ठाणे महानगरपालिकेने शुक्रवारपासून ठाण्यातील मॉल्स आणि ठाणे रेल्वे स्टेशनवर antigen testing करण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला योग्य खबरदारी घेऊन मॉल्स सुरु करण्यात परवानगी देण्यात आली होती.

Malls | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) शुक्रवारपासून (5 सप्टेंबर) ठाण्यातील मॉल्स (Malls) आणि ठाणे रेल्वे स्टेशनवर (Thane Railway Station) antigen testing करण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला योग्य खबरदारी घेऊन मॉल्स सुरु करण्यात परवानगी देण्यात आली होती. सर्व मॉल्सच्या प्रवेशद्वारावर टेस्टिंग किट्स (Testing Kits) पुरवण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी (TMC Deputy Commissioner Sandeep Malvi) यांनी सांगितले आहे. आम्ही विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) येणाऱ्या सर्व ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची टेस्ट करत आहोत. या टेस्टचे रिपोर्ट्स ग्राहकांना देण्यात येत आहेत, अशी माहिती संदीप माळवी यांनी दिली आहे.

नागरी समितीने ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सुद्धा antigen testing करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत आम्ही आमची चाचणी क्षमता वाढवून 5000 पर्यंत नेली आहे. गुरुवारी एकूण 5052 चाचण्या करण्यात आल्या, असे माळवी यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेने दिवसाला सुमारे 3000 चाचण्या केल्या. त्यापूर्वीच्या महिन्यात 2000 चाचण्या केल्या जात होत्या. त्याचप्रमाणे BMC पेक्षाही ठाण्यात अधिक कोरोना चाचण्या केल्या जात आहेत, असा दावा नागरी समितीकडून करण्यात आला आहे.

राज्य सरकारने सर्व मॉल्स सुरु करण्यास 5 सप्टेंबरपासून मुभा दिली होती. परंतु, ठाण्यातील मॉल्स बुधवारपासून उघडण्यात आले होते. सध्या फक्त विवियाना मॉल लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. इतर मॉल्स सुरु होताच त्यांनाही टेस्टिंग किट्स पुरवण्यात येतील, असे माळवी यांनी सांगितले.

दरम्यान ठाण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 140991 वर पोहचला असून त्यापैकी 113785 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 23270 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात कोरोना संसर्गामुळे एकूण 3935 मृतांची नोंद झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement