Thane Jewellery Shop Robbery: ठाणे येथील ज्वेलरी शॉपवर दरोडा; 7 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला
ठाणे येथील एका दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे 6.5 किलो सोने चोरीस गेले आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या चोरट्यांनी ही जबरी चोरी केली. दरम्यान, आणखी एका वेगळ्या प्रकरणात, 25 लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्कीटांची चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
Theft in Maharashtra: ठाणे रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या एका दागिन्यांच्या दुकानात मोठी चोरी (Jewellery Shop Theft) झाली आहे. चोरट्यांनी या दुकानात असलेले सुमारे 7 कोटी रुपयांचे 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरून (Thane Jewellery Shop Robbery) नेले. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 1:30 ते पहाटे 4:00 वाजणेच्या दरम्यान ही घटना घडली. ज्वेलरी शॉपमध्ये झालेल्या जबरी चोरीमध्ये दोन इसमांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून तपाससुरु आहे.
ज्वेलर्स व्यवस्थापनाच्या अक्षम्य चुका
दरोड्याचा तपशील सांगताना पोलिसांनी म्हटले की, ज्वेलरी शॉप मध्ये झालेली चोरी मोठी असली तरी, ज्वेलरी व्यवस्थापनाच्याही काही चुका आढळून आल्या आहेत. चोरांनी प्रथम पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आणि नंतर जबरदस्तीने दुकानाचे शटर उघडून दुकानात प्रवेश केला. दरम्यान, आतल्या बाजूस त्यांना दागिगने काचेच्या फडतालांमध्ये तसेच उघडे असल्याचे आढळून आले. दुकान व्यपस्थापनाने रात्रीची वेळ असूनही हे दागिने तसेच उघड्यावर ठेवले होते. वास्तविक पाहता हे दागिने त्यांनी तिजोरीत बंद करुन सुरक्षीत ठेवायला हवे होते. पण, त्यांनी तसे केले नाही. व्यवस्थापनाने पारंपरिक सुरक्षा उपायांचा उपयोग केला नाही आणि निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे अशा प्रकारची चोरी अधिक जलद गतीने चोरट्यांना करता आल्याचे पोलिसांनी म्हटले. (हेही वाचा, Mumbai Police Busts Cyber Scam: मुंबई पोलिसांनी केला कोट्यवधींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक, 70 बँक खाती जप्त)
गुन्हा दाखल तपास सुरु
पोलिसांनी पुढे बोलताना सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि चोरलेले सोने परत मिळवण्यासाठी अनेक तपास पथके तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, स्थानिकांची चौकशी करत आहेत आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी न्यायवैद्यक पुराव्यांचाही आधार घेतला जात आहे. 'आमची पथके या अत्याधुनिक दरोड्याचे निराकरण करण्यासाठी सर्व संभाव्य माहितीचा मागोवा घेत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत', असे अधिकाऱ्याने सांगितले.
स्वतंत्र प्रकरणः 25 लाखांच्या सोन्याच्या बिस्कीट चोरीप्रकरणी दोघांना अटक
दरम्यान, एका वेगळ्या घटनेत ठाणे पोलिसांनी 25 लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीप्रकरणी दोन जणांना अटक केली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील सुनील निणवा पाटील (56) आणि ठाणे येथील रामानंद छोटेलाल यादव (46) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही चोरी 26 नोव्हेंबर रोजी घडली, जेव्हा दोघांनी नालासोपारा (पूर्व) येथील रहिवाशाला 375.18 ग्रॅम सोन्याच्या बिस्कीटांसह लक्ष्य केले. पीडित व्यक्ती भायंदर रेल्वे स्थानकाकडे जात असताना आरोपींनी त्याची पिशवी हिसकावून घेतली आणि ऑटोरिक्षात बसून पळून गेले. (हेही वाचा: Share Trading Frauds: शेअर बाजार घोटाळा, मुंबईतील दोन सुशिक्षित महिलांची दोन कोटी रुपयांची फसवणूक)
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल डेटा विश्लेषणाचा वापर करून संशयितांचा मागोवा घेतला. त्यांच्याकडून 20.1 लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही घटनांमुळे या प्रदेशातील सोन्याच्या चोरीची वाढती वारंवारता अधोरेखित झाली आहे. या घटनांमुळे पोलिसांनी व्यवसाय आणि नागरिकांना कठोर सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)