Thane Hit-And-Run: ठाणे येथे हिट अँड रन अपघातात 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident News: ठाणे येथे हिट अँड रन अपघातात एका 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चालकाची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात आहे.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Thane Accident News: ठाणे येथे घडलेल्या हिट अँड रन (Thane Hit-and-Run) प्रकरणात 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना, नाशिक-मुंबई मार्गावरील (Nashik-Mumbai Road) नितीन जंक्शनजवळ पहाटे 1:45 च्या सुमारास ही घटना घडली. दर्शन हेगडे असे पीडितेचे नाव असून तो बीएससीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. वागळे इस्टेट येथील संत दिनश्वर नगर येथील रहिवासी असल्या दर्शन यास भरधाव कारने धडक दिली. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत सोडून कार चालकाने आपल्या वाहनासह पळ काढला. स्थानिकांनी जखमी दर्शन यास रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.

चुकीच्या पद्धतीने वाहन हाकने बेतले जीवावर?

नौपाडा पोलिसांनी (Naupada Police) दिलेल्या माहितीनुसार, दर्शन अन्न खरेदी करण्यासाठी त्याच्या कार्यालयातून बाहेर पडला होता, तेव्हा हा अपघात (हिट अँड रन प्रकरणात मोडणारा) झाला. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने हेगडे विरुद्ध दिशेने मोटारसायकल चालवत असताना त्याला धडक दिली. धडक दिल्यानंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. दर्शन मात्र, जखमी अवस्थेमध्ये तिथेच पडून राहिला. गंभीर मार लागल्याने तो असहाय होता. असह्य वेदनांनी विव्हळत असलेला अपघातग्रस्त तरुण एका प्रवाशाला आढळून आला. त्याने पीडितास तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यास मृत घोषीत केले. (हेही वाचा, Kalyan Road Accident: रिक्षाच्या धडकेत 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)

नौपाडा पोलिसांकडून तपास सुरु

नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पुष्टी केली की, अज्ञात चालका विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि संबंधित वाहन ओळखण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. एकदा आम्ही नंबर प्लेटची माहिती मिळवली की, आम्ही चालकाचा शोध घेण्यासाठी ती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठवू. आम्ही लवकरच संशयिताला अटक करू असा आम्हाला विश्वास आहे, असे निरीक्षक महाजन यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती असलेल्यांनी पुढे येऊन तपासात मदत करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. (हेही वाचा, Kolhapur Accident: रस्त्यावरून जात असताना भरधाव कारने तरुणाला उडवले, चालक फरार , गुन्हा दाखल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये, पीडित हा विरुद्ध दिशेने आपले वाहन चालवत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे नियम डावलने हेच त्याच्या मृत्यूस कारण ठरले का? असा सवाल आता उपस्थित होतो आहे. वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करा, असे अवाहन पोलिसांकडून अनेकदा केले जाते. तरीही नागरिक आपले प्राण धोक्यात घालून वाहन हाकताना आढळतात, याबाबत ज्येष्ठ नागरिक चिंता व्यक्त करतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now