Dombivli: डोंबिवली येथून Orangutan आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसह Exotic Species जप्त; वन विभाग आणि पोलिसांची कारवाई
ज्यामध्ये असंख्य विदेशी आणि लुप्तप्राय वन्यजीव प्रजाती जप्त करण्यात आल्या.
Maharashtra Wildlife Crime: ठाणे वन विभागाने (Thane Forest Department) स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत असंख्य विदेशी (Exotic Species Seized) आणि लुप्तप्राय वन्यजीव प्रजाती जप्त केल्या आहेत. ही कारवाई 9 नोव्हेंबर रोजी डोंबीवली (Dombivli Wildlife Raid) येथील एका निवासस्थानी करण्यात आली. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये गंभीरपणे लुप्तप्राय होत असलेल्या ओरंगुटन प्रजातीचा (Orangutan Seized) समावेश होता. ही प्रजाती इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरने (IUCN) नामशेष होण्याचा उच्च धोका म्हणून सूचीबद्ध केली आहे. या प्रकरणात वन्यजीव कायद्यान्वये (Wildlife Protection Act) अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली येथील प्रतिष्ठीत वसाहतीत धक्कादायक प्रकार
वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे (WCCB) अधिकयकारी अंकित व्यास यांनी छाप्याबाबत माहिती देताना सांगितले की, डोंबीवली येथील एका उंच इमारतीतील एका सदनिकेमध्ये काही लोक बेकायदेशीर कृतीमंध्ये गुंतले असून, त्यांच्याकडे विविध प्रकारचे प्राणी असल्याची संशयास्पद माहिती आमच्याकडे आली होती. या माहितीच्या आधारे आम्ही कारवाई केली, असता लुप्त होत असलेल्या प्रजातींचा समावेश असलेले अनेक वन्य प्राणी आम्हाला येथे आढळून आले.
वन्यजीव तस्करी रॅकेट?
अंकित व्यास यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, बेकायदेशीर वन्यजीव कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या एका कुटुंबाने भाड्याने घेतले होते. "कल्याण वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, ठाणे वन विभाग अधिकाऱ्यांनी मालमत्तेवर छापा टाकला, ज्यामध्ये अनेक विदेशी सरपटणारे प्राणी आणि एक ओरंगुटन आढळून आले". अधिवासाचे नुकसान आणि बेकायदेशीर व्यापार हे ओरंगुटनांसाठी मोठे धोके आहेत. त्यामुळे हे कारवाई अतिशय महत्त्वाची ठरते. इतकेच नव्हे तर, या लोकांनी या प्रजाती बेकायदेशीररित्या सोबत का बाळगल्या होत्या. त्यांची तस्करी करण्याचा त्यांचा हेतू होता का? इतकेच नव्हे तर त्यापाठी काही रॅकेट सक्रीय आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. (हेही वाचा, Python Illegal Handling: अजगर बेकायदेशीपणे हाताळणे महागात, भायखळा येथून एकास अटक)
पलवा सिटी येथे कारवाई
ठाणे वन विभाग द्वारे करण्यात आलेल्या कारवाईबाबत एक अधिकृत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, राज्य राखीव पोलीस दल आणि मनपाडा पोलिसांच्या मदतीने ठाणे आणि कल्याण वन विभागांनी एक्सपीरिया मॉलजवळील पलवा सिटी सवर्ण बिल्डिंग बी विंग येथे छापा टाकला. या कारवाईत अधिकाऱ्यांनी 8 व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 806 वरून कासव, साप, अजगर आणि इगुआना यासह प्रतिबंधित विदेशी प्राणी जप्त केले. छाप्यादरम्यान आरोपी घटनास्थळी आढळून आले नाहीत. मात्र, त्यांनाही ताब्यात घेण्यासाठीकारवाई सुरु आहे.
ठाण्याचे मानद वन्यजीव वॉर्डन आणि आर. ए. डब्ल्यू. डब्ल्यू. (रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर) चे अध्यक्ष पवन शर्मा यांनी या मोहिमेचे कौतुक केले आणि नमूद केले की, "बेकायदेशीर वन्यजीव तस्करी हा जागतिक स्तरावर सर्वात संघटित गुन्ह्यांपैकी एक आहे. जलद नफ्यासाठी शहरी भागात विदेशी प्राण्यांची विक्री अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. हा छापा वन विभागासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, विशेषतः वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 मध्ये नुकत्याच केलेल्या सुधारणांमुळे, ज्यात आता कायद्यांतर्गत विदेशी प्रजातींचा समावेश आहे.