Thane: ठाणे येथील नौपाडा परिसरात रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार
हल्लेखोरांनी या तरुणावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर घंटाळी येथील प्रमुख समजल्या जाणाऱ्या राम मारुती रस्त्यावरील (Ram Maruti Road) मुख्य बाजारपेठेला जोडलेला सर्वात लोकप्रिय भाग आहे.
ठाणे (Thane) येथील नौपाडा (Naupada) परिसरात रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या 30 वर्षीय तरुणावर शुक्रवारी (21 ऑक्टोबर) सकाळी जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी या तरुणावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर घंटाळी येथील प्रमुख समजल्या जाणाऱ्या राम मारुती रस्त्यावरील (Ram Maruti Road) मुख्य बाजारपेठेला जोडलेला सर्वात लोकप्रिय भाग आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नौपाडा पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली. पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, नौपाडा पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतरपणे तपास करत आहेत. मालमत्तेच्या वादातून हा हल्ला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असून, दोषींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. अधिक माहिती अशी की, अश्विन गंगोरे म्हणून ओळखल्या जाणार्या रिअल इस्टेट एजंटचे एक दुकान आहे. जे मालमत्तांचे व्यवहार करतात. (हेही वाचा, Nashik: प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर, महिलेचा नवरा येताच मारली इमारतीवरून उडी, ठरली शेवटची भेट)
गोळीबाराच्या आवाजाने पेट्रोल पंपाजवळ राहणारे नागरिक जागे झाले. किशोर पेट्रोल पंपाचे रहिवासी, जयेश जोशी यांनी मिड-डेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, पहाटे 3:45 ते पहाटे 4 च्या दरम्यान आम्ही लोक एकमेकांवर ओरडत असल्याचे ऐकले आणि नंतर गोळीबाराचे आवाज ऐकले. तथापि, मला काहीही दिसत नव्हते. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सकाळी आम्हाला पीडितेच्या कारवर आणि त्याच्या ऑफिसमध्ये गोळ्यांच्या खुणा दिसल्या.
दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने ठाण्यातील मुख्य बाजारपेठेचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम मारुती रोड परिसरात खळबळ उडाली आहे. अशा पद्धतीने गोळीबार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.