Thane Fire: भिवंडी मध्ये खोका कंम्पाऊंड मधील कारखान्याला भीषण आग; जीवितहानी नाही
खबरदारीचा उपाय म्हणून नजिकच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
मुंबई नजिक ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरामध्ये आज (13 नोव्हेंबर) आज सकाळी आगीचा भडका उडाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही आग खोका कंपाऊंड परिसरातील एका कारखान्याला लागली आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि अन्य आपत्कालीन सेवेतील कर्मचारी आणि यंत्रणा रवाना झाल्या आहेत. त्यांच्याकडून अअगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
खोका कंपाऊंड मधील कारखान्यामध्ये कपडे मोठे प्रमाणात असल्याने आग पटापट वाढत गेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नजिकच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या आग लागलेल्या कारखान्याच्या नजिकच रहिवासी वसाहत आहे. त्यामुळे त्यांनी अअग लागल्याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला दिली आणि थोड्याच वेळात त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
ANI Tweet
काही दिवसांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये ही आगीचा भडका उडाला होता मात्र ती अगदी सौम्य स्वरूपाची असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र दक्षिण मुंबईत मुंबई सेंट्रल नजिकच्या लागलेल्या मॉलची आग 2 दिवस धुमसत होती.