Asangaon Fire: ठाण्यातील आसनगाव मध्ये प्लॅस्टिक फॅक्टरीला भीषण आग; 12 फायर इंजिन घटनास्थळी दाखल

कंपनीला ही आग लागली आहे. आगीची भीषणता पाहून तातडीने भिवंडी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत.

Fire breaks out at a plastic factory in Asangaon | Photo Credits: ANI

ठाणे जिल्ह्यातील आसनगाव भागामध्ये आज (9 मार्च) सकाळी भीषण आगीचा आगडोंब उसळला आहे. दरम्यान ANI Tweets च्या माहितीनुसार ही आग एका प्लॅस्टिक फॅक्टरीला लागली आहे. आगीची दाहकता मोठी असल्याने सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10-12 फायर इंजिन घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. सकाळपासून आग धुमसत असल्याने या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

न्यूज 18 लोकमच्या रिपोर्ट्सनुसार, शहापूर मध्ये वेहळोली आसनगाव फाटा येथे असलेल्या एस.के.आय. कंपनीला ही आग लागली आहे. आगीची भीषणता पाहून तातडीने भिवंडी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. आगीचे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच दिलासादायक बाब म्हणजे या आगीच्या दुर्घटनेमध्ये अजूनही कोणत्याही जिवितहानीची घटना समोर आलेली नाही. परंतू कंपनीचे आगीत मोठे नुकसान झालेले असू शकते.

ANI Tweet

(नक्की वाचा: Kolkata Fire Tragedy: रेल्वे इमारतीच्या आगीत 9 मृतांच्या कुटुंबियांना PM Narendra Modi यांच्याकडून मदत जाहीर).

दरम्यान मागील काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे शहरांत आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ठाण्यात रविवारी सकाळी आग लागली होती. शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये लागलेल्या या आगीमध्ये 4 दुकानं जळून खाक झाल्याच वृत्त आहे. मात्र तासाभरात या आगीवर नियंत्रण देखील मिळवले होते.