Thane: ड्रग्ज प्रकरणात वाँटेड नायजेरियन व्यक्तीचा मृतदेह जंगलात आढळला

हा व्यक्ती पाठिमागील अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा होता. हा व्यक्ती ड्रग्ज प्रकरणात गुंतला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याचा मृतदेहच हाती लागला. जो इज्जिकल (Joe Izzikil) असे या व्यक्तीचे नाव आहे.

Dead Body | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

ठाण्यातील (Thane) जंगलात एका नायजेरियन व्यक्तीचा (Nigerian Person) मृतदेह आढळला आहे. हा व्यक्ती पाठिमागील अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा होता. हा व्यक्ती ड्रग्ज प्रकरणात गुंतला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याचा मृतदेहच हाती लागला. जो इज्जिकल (Joe Izzikil) असे या व्यक्तीचे नाव आहे. राज्यात पाठिमागील काही वर्षांपासून विदेशी व्यक्तींचा ड्रग्ज प्रकरणातील सहभाग वाढत असल्याचे चित्र आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक नायजेरीयन व्यक्ती सहभागी असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. काहीना अटक करण्यात पोलिसांना यश येते. काही मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन करण्यात यशस्वी होता.

ठाणे शहर पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जो इज्जिकल हा ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना हवा होता. पोलिसांनी रविवारी सकाळी त्याचा पाटलाग केला तेव्हा तो ठाण्यातील जंगलात पळून गेला. पोलिसांनी काही काळ पाटलाग सुरु ठेवला. परंतू, तो नागलाबंदरजवळील जंगलात गायब झाला होता. दरम्यान, त्याचा मृतदेह आढळून आला. (हेही वाचा, Digital Drugs: जाणून घ्या काय आहे डिजिटल ड्रग्ज; दारू, कोकेन, चरस, गांजानंतर नशेसाठी होत आहे खास प्रकारच्या संगीताचा वापर)

जंगलातील एका निर्जन ठिकाणी असलेल्या घराजवळ एका पाईपवर इझीकील याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले परंतू, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.