COVID 19 In Thane: Vedanta Hospital मध्ये 4 रूग्ण ऑक्सिजन अभावी दगावल्याचा नातेवाईकांचा दावा; जिल्हाधिकार्यांनी समिती नेमून दिले मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचे निर्देश
ठाणे जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या 4 रूग्णांच्या मृत्यू प्रकरणी समिती नेमण्यात आली असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
ठाणे (Thane) येथील वेदांत रूग्णालयामध्ये (Vedanta Hospital) 4 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर सकाळी त्यांच्या नातेवाईकांकडून काही काळ गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या नातेवाईकांचा आरोप आहे की ऑक्सिजन (Oxygen) न मिळाल्याने रूग्ण दगावले. यावर ठाणे महानगरपालिकेने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या चारही रूग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत असे सांगण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या 4 रूग्णांच्या मृत्यू प्रकरणी समिती नेमण्यात आली असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
मीडीया रिपोर्ट्स वृत्तानुसार, वर्तक नगर मधील वेदांता रूग्णालयात 53 रूग्ण उपचार घेत होते त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलकडून त्यांच्या मृत्यूमागील कारण सांगितलं जाईल. दरम्यान रुग्णांच्या मृत्यूचं वृत्त समजल्यानंतर भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळेस भाजपासोबत मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली होती.यावेळी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी देखील भेट दिली आहे.
ANI Tweet
दरम्यान काल ठाणे महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 1054 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर 10 मृत्यू झाले आहेत. ठाण्यात अजूनही 13062 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.