Thane Building Slab Collapse: सातमजली इमारतीचा स्लॅब कोसळून तिघे जखमी, ठाणे येथील घटना

जखमींमध्ये 14 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. ही घटना घडताच मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आल्याचे समजते.

Injury | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Thane Building Slab Collapse: सातमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 14 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. ही घटना घडताच मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आल्याचे समजते. ही घटना ठाणे येथील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येते घडली. नौपाडा परिसरातील अमर टॉवर नावाची सात मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक 101 चा स्लॅब कोसळला.

इमारत कोसळल्यानंतर वेगाने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत (अमर टॉवर) 25 वर्षापूर्वीची आहे. प्रथमेश सूर्यवंशी (28 वर्षे), विजया सूर्यवंशी (54 वर्षे), अथर्व सूर्यवंशी (14 वर्षे) असे जखमींची नावे आहेत. (हेही वाचा, Thane: ठाण्यातील भिवंडी परिसरातील गोदामाला भीषण आग, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल, Watch Video)

अधिक माहिती अशी की, स्लॅब कोसळले तेव्हा इमारतीत एकूण पाच जण अडकले होते. याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हे जवान दाखल झाले त्या वेळी इमारतीत 5 जण अडकले होते. त्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी तिघे जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif