Murder Due to Menstruation: मासिक पाळीचे रक्त पाहून भावाच्या मनात शरीरसंबंधाचे भूत; अंगावर चटके देऊन बहिणीची हत्या
Kill | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मासिक पाळी (Menstrual Cycle) आल्यावर होणाऱ्या रक्तस्त्रावावरुन (Menstrual Blood) संशयाचे भूत डोक्यात घेतलेल्या भावाने बहिणीची क्रुर हत्या केली आहे. ही घटना ठाणे *(Thane) जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरात घडली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी क्रुर भवाला अटक केली आहे. मासिक पाळी दरम्यान बहिणीच्या योनितून झालेला रक्तस्त्राव पाहिल्यावर भावाच्या डोक्यात संतापाची लाट गेली. बहिणीने कोणासोबत तरी शरीरसंबंधच ठेवले आहेत. ज्यामुळे तिच्या योनितून रक्तस्त्राव होतो आहे, असा गैरसमज भावाने करुन घेतला. त्यानंतर या भावाने बहिणीला मारहाण केली आणि तिच्या शरीरावर गरम वस्तूने चटकेही दिले. या वेदना असहय्य झाल्याने बहिणीचा मृत्यू झाला आहे.

ठाणे शहरानजिक असलेल्या उल्हासनगर परिसरातील शांतीनगर येथे ही घटना घडली. पीडिता केवळ 12 वर्षांची आहे. ती आपला भाऊ आणि त्याच्या पत्नीसोबत राहात होती. दरम्यान, तिला पहिल्यांदाच मासिक पाळी आली. ती पाहून तिच्या वहिनीणे म्हणजेच भावाच्या पत्नीने आरोपीला चुकीची माहिती दिली. तुमच्या बहिणीने बाहेर कुठेतरी शेण खाल्ले आहे. तिने कोणासोबत तरी शीरिरंबंध ठेवले आहेत. त्यातूनच हा रक्तस्त्राव होतो आहे, असे तिने आपल्या पतीला सांगितले. पत्नीने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन भाऊ सैतान झाला. त्याने आपल्या बहिणीचा सलग तीन दिवस अनन्वीत छळ केला. तिला मारहाण तर केलीच. परंतू, गरम वस्तूने अंगावर चटकेही दिले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण सहन न झाल्याने त्या कोवळ्या जीवाने प्राण सोडले. (हेही वाचा, Jalna Sexually Abuse Case: मेव्हणीवर दाजी फिदा, साडूला फोन करुन म्हणतो 'मला आवडते तुझी बायको'; पोलिसांकडून थेट अटक; जाणून घ्या प्रकरण)

दरम्यान, बहिण बेशुद्ध पडल्यानंतर भावाने स्वत:च तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. तिच्या मृतदेराचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा तिच्या मानेवर, पाठीवर, पोटावर, चेहऱ्यावर आणि शहराच्या इतरही भागावर चटके दिल्याचे आढळून आले. मारहाणीच्या ओल्या जखमा आणि मुक्का मार लागल्याने अंतर्गत रस्तस्त्रावही आढळून आला. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालाबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि गुन्हाही दाखल केला.