Thane: अमेरिकन महिला हत्या प्रकरणातील आरोपीस झेक प्रजासत्ताकातील प्राग येथे अटक; महाराष्ट्र पोलिसांच्या तपासाला यश

ठाणे जिल्ह्यात 2003 मध्ये घडलेल्या या हत्या प्रकरणातील आरोपीस झेक प्रजासत्ताकाचा ( Czech Republic) एक भाग असलेल्या प्राग (Prague) येथे अटक झाली.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मित्राची पार्टनर असलेल्या अमेरिकी महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला तब्बल 19 वर्षांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे जिल्ह्यात 2003 मध्ये घडलेल्या या हत्या प्रकरणातील आरोपीस झेक प्रजासत्ताकाचा ( Czech Republic) एक भाग असलेल्या प्राग (Prague) येथे अटक झाली. झेकमध्ये अटक झाल्यानंतर त्याला भारताच्या हवाली करण्यात आले अशी माहिती एमबीव्हीव्ही पोलिसांनी (MBVV Police) दिली आहे.

प्रग्नेश महेंद्रकुमार देसाई नाम व्यक्तीने विपूल पटेल नामक व्यक्तीस 30 लाख रुपये दिले होते. पटेल हा मूळचा गुजरातमधील वडोदरा येथील राहणारा होता. तसेच त्याने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे नागरिकत्व ( US citizenshi) घेतले होते. हे तीस लाख रुपये त्याने त्याची पार्टनर लिओना जी स्विडेस्की ( Leona G Swidesk, वय 33, वर्षे त्या वेळी) याची हत्या करण्यासठी घेतले होते.

मीरा भायंदर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विपूल पटेल याने त्याची पार्टनर असलेली विदेशी पत्नी लिओना जी स्विडेस्की हिला ठार मारण्याचा विचार देसाई याला बोलून दाखवला होता. त्यानुसार 8 फेब्रुवारी 2003 रोजी पटेल आणि नंतरच्या काही सहकाऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत एका निर्जन भागात नेले आणि गळा दाबून ठार मारले. त्यानंतर काशिमीरा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा, Crime: मुंबईत 430 किलो भेसळयुक्त चहा जप्त, दोघांना अटक)

लिओना जी स्विडेस्की या अमेरिकी महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. त्या आरोपींना न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी 2004 मध्ये दोषमुक्त केले. मात्र, या प्रकरणात सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिलेल्या देसाई याला पोलिसांनी 9 मार्च रोजी वडोदरायेथून अटक केली होती. नंतर त्याला जामीन मिळाला होता. मात्र, पटेल हा मात्र, देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला होता. अखेर त्याला गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर 2021 मध्ये झेक प्रजासत्कातील प्राग येथे अटक झाली. आता त्याला भारतात पाठविण्यात आले आहे. तो सध्या काशिमीरा पोलीसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif