अंबरनाथ: मुसळधार पावसामुळे रिक्षा स्टँन्डवर झाड कोसळले, एका चालकाचा मृत्यू तर 3 जखमी

अंबरनाथ (Ambarnath) येथील रिक्षा सँन्डवर (Rickshaw Stand) शुक्रवारी (28 जून) पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील एका रिक्षावर झाड कोसळे.

अंबरनाथ: रिक्षा सँन्डवर झाड कोसळले (फोटो सौजन्य-ANI)

अंबरनाथ (Ambarnath) येथील रिक्षा सँन्डवर (Rickshaw Stand) शुक्रवारी (28 जून) पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील एका रिक्षावर झाड कोसळे. या दुर्घटनेत एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पूर्वेला रेल्वेस्थानकाबाहेर असणाऱ्या शिवजी चौकातील मुख्य रिक्षा सँन्डवर झाड पडले. तर कोसळलेल्या झाडातून विजेची तार सुरु असल्याने चालकाला त्याचा धक्का लागून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विजेची वाहिनी बंद करण्यापूर्वीच चालकाचा मृत्यू झाला होता.

तसेच या प्रकरणी अन्य 3 जण जखमी झाले आहेत. कालपासून मुंबईसह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला. या पहिल्याच पावसात पालघर, दादर, गोरेगाव येथे सुद्धा नागरिकांचे बळी आणि जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.