Andheri By Election: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मोठा ट्वीस्ट! मुरजी पटेल यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी असल्याचा दावा करत ठाकरे गटाचा भाजप उमेदवारावर आक्षेप
राज्य सरकारने पटेल यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली असा दावा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने केला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात चर्चा आहे ती फक्त अंधेरी पूर्व मतदार संघाच्या (Andheri East By Election) पोट निवडणुकीची. कारण शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटासाठी ही फक्त निवडणुक नसुन ती आता प्रतिष्ठेची लढत झाली आहे. तरी या निवडणुकीत सामना डायरेक्ट शिंदे विरुध्द ठाकरे असा होणार नसुन महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुध्द भाजप (BJP) असा होणार आहे. कारण या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या गटाने आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नसुन त्यांनी फक्त आपल्या मित्र पक्षास पाठींबा दर्शवला आहे. पण भाजप कडून निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या उमेदवारावर मात्र शिवसेना उध्दव बाळाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या या आक्षेपामुळे आता निवडणुकीत वेगळा ट्वीस्ट आला आहे.
भाजपकडून (BJP) अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East By Election) मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पण राज्य सरकारने पटेल यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली असा दावा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने केला आहे. तसेच बंदी असतानाही निवडणुक आयोगाकडून मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल कसा करुन घेतला असा सवाल विचारत ठाकरे गटाने मुरजी पटेल यांच्या गटावर आक्षेप घेतला आहे. (हे ही वाचा:- CM Eknath Shinde: मुंबईच्या कायापालटासाठी खड्डे आणि झोपडपट्टीमुक्ती आवश्यक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक संदीप नाईक (Sandeep Naik) यांनी विशेष पत्रकार परिषदेत घेत भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. एवढचं नाही तर याविरोधात लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी या पत्रकार परिषदेत जाहिर केलं जाहीर केलं आहे.