MVA On Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात ठाकरे सरकारने दिले चौकशीचे आदेश
या आदेशानंतर बावनकुळे यांच्या अडचणी वाढू शकतात. चंद्रशेखर बावनकुळे 2014 ते 19 या काळात ऊर्जामंत्री होते.
महाराष्ट्रातील भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Government) वाद आता वाढत चालला आहे. राज्य पोलीस दल आणि प्रशासनाच्या गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारने नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक केली. गोपनीय कायद्यांचा भंग करत माहिती लीक केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली. त्यांना आरोपी बनवण्याचा प्रयत्न केला, असा भाजपचा आरोप आहे. मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर फोर्टमधील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता भाजपचा ओबीसी चेहरा म्हटल्या जाणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या विरोधात ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत. या आदेशानंतर बावनकुळे यांच्या अडचणी वाढू शकतात. चंद्रशेखर बावनकुळे 2014 ते 19 या काळात ऊर्जामंत्री होते. या पाच वर्षांत बावनकुळे यांच्या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. अशा प्रकारे चंद्रशेखर बबनकुळे ऊर्जामंत्री असताना राज्य सरकारच्या महावितरण कंपनीच्या पाच वर्षांच्या कामांची चौकशी होणार आहे. हेही वाचा Supriya Sule On BJP: सत्तेच्या सात वर्षात भाजपने विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काय केले? सुप्रिया सुळेंचा मोदींना सवाल