Mumbai Accident: मरिन ड्रायव्ह येथे भीषण अपघात, कारने भरधाव दुचाकीला उडवले (Watch Video)

हा अपघात रविवारी दुपारी घडला. एका भरधाव दुचाकीला कारने धडक दिली. हा अपघात एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Marine Drive Accident PC TW

Mumbai Accident: मुंबईतील मरिन ड्रायव्ह (Marine Drive) येथे भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला. एका भरधाव दुचाकीला कारने धडक दिली. हा अपघात एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. (हेही वाचा- मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, झाडाची फांदी कोसळून तीन जखमी (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी भरधाव वेगात होती, तेवढ्यात रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या ह्युन्डाई क्रेटा कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी पुढे जाऊन एका बॅरिकेडरला धडकली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. रस्त्यावर अपघात पाहताच, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तरुणाला वाचवण्यासाठी नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला.

अपघाताचा व्हिडिओ

घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. समोर आलेल्या व्हिडिओत, कारच्या मागील व्ह्यू दिसत आहे. ज्यात दुचाकीस्वार भरधाव वेगात स्कूटी चालवत आहे. पुढे जाऊन दुचाकीस्वाराने सिग्नल तोडण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात पुढे कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, ज्यामुळे दुचाकीस्वार बॅरिकेडला धडकले. बॅरिकेड्स मुळे त्याचा जीव वाचला असल्याचे नागरिकांनी सांगितले.