Maharashtra Temperature Update: महाराष्ट्रात उकाडा वाढला, 30 आणि 31 मार्च दरम्यान विदर्भ व संलग्न मराठवाडा भागात तापमान वाढीची शक्यता

तसेच येथील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.

Heat wave. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra Temperature Update) उकाडा वाढत चालला असून सामान्य नागरिकांनाच्या उन्हाच्या झळ्या सोसाव्या लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीतही उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 30 आणि 31 मार्च दरम्यान विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील भागात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच येथील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.

काल (27 मार्च) मुंबईत मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. येथील तापमान 40 अंशावर पोहोचले होते. काल कोकणातील काही शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सियस पर्यत पोहचल्याची माहिती सरकार यांनी दिली आहे. त्यामुळे शक्यतो दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडू नका, चेहरा झाकण्यासाठी रुमालाचा वापर करा, भरपूर पाणी प्या असं आव्हान हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Mumbai Temperature: मुंबईमध्ये उष्णता वाढली; आज 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद, उकाड्यामध्ये होणार अजून वाढ 

के.एस. होसाळीकर यांनी मुंबईच्या तापमानाची माहिती देण्यासोबतच सर्वांना या दरम्यानच्या काळात काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. पुढील काही दिवसही उकाडा असाच कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं उन्हाचा दाह आता अडचणीचा विषय ठरत आहे.

होसाळीकर यांनी हे देखील सांगितले की, मार्चमधील सर्वाधिक तापमान हे 28 मार्च 1956 रोजी नोंदवण्यात आले होते, ते 41.7 डिग्री सेल्सियस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गरम व कोरड्या उत्तर पश्चिम वाऱ्यामुळे मुंबईत उष्णता वाढत आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांच्यामते 15 फेब्रुवारीपासून मुंबईत हवामान बदलण्यास सुरुवात होते.