IPL Auction 2025 Live

Maharashtra Weather: अकोल्यात 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, जिल्ह्यात कलम 144 लागू

विदर्भात ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांतात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक उष्ण तापमान आहे

Summer Advisory By Health Ministry

Maharashtra Weather: राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन्हाचा तडाखा बसत आहे. विदर्भात 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांतात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक उष्ण तापमान आहे. अकोला शहरात 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. जास्त तापमान वाढल्याने अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी (CRPC कलमानुसार १४४ ) संचारबंदी लावली आहे.  (हेही वाचा- छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताने १७ वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू, उष्माघाताचा दुसरा बळी)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की, आस्थापनांना, कामगारांना पिण्याची पाण्याची आणि पंख्याची पुरशी सोय करावी. तसेच खासगी क्लासेच्या वेळेत बदल करावे, दुपारच्या वेळ क्लासेस घेऊ नयेत. IMD च्या अंदाजानुसार, अकोला जिल्ह्यात शुक्रवारी 45.8 अंश सेल्सिअस आणि शनिवारी 45.6 सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात मे महिन्यात सर्वोच्च तापमान आहे.

वाढत्या तापमानामुळे अकोला जिल्ह्यात शनिवारी 31 मे पर्यंत कलम 144 लागू केले आहे. लोकांना उष्णाघाताचा त्रास होऊ नये याकरिता जिल्ह्याधिकाऱ्यांने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील अकोला शहरात पुढील पाच दिवस आणि चंद्रपूर शहरात पुढील चार दिवस उष्णतेची लाट उसळणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने यलो अर्टल जारी केला आहे.