खोपोली: विद्यार्थिनीला अश्लील मेसेजेस पाठविणा-या शिक्षकाला मनसेचा दणका; रस्त्यावरुन अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड
हा संपुर्ण प्रकार मनसे कार्यकर्त्यांना समजताच त्यांना या शिक्षकाला बेदम चोप देत त्याची खोपोली परिसरात धिंड काढली
गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना खोपोली (Khopoli) परिसरात घडली आहे. येथील एका नामांकित विद्यालयात शिकवणा-या शिक्षकाने त्याच विद्यालयात शिकणा-या विद्यार्थिनीला अश्लील मेसेजेस पाठविल्याची घटना उघडकीस आली आहे. हा संपुर्ण प्रकार मनसे कार्यकर्त्यांना समजताच त्यांना या शिक्षकाला बेदम चोप देत त्याची खोपोली परिसरात धिंड काढली. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश भिवा देवमुंडे असं शिक्षकाचं नाव असून तो खोपोली येथील जनता विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थिनीला देवमुंडे हा शिक्षक मागील काही दिवसांपासून अश्लील मेसेज पाठवत होता. याबाबत तरुणीने आपल्या पालकांना तसेच खोपोली शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपी शिक्षकाची गावातून अर्धनग्न करुन धिंड काढली.
आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पीडित मुलीने पोलिसांना सांगितला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मनसे कार्यकर्त्यांनीन या सुरेश देवमुंडे याला बेदम चोप देत त्याची धिंड काढली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. नालासोपारा: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्या कारणाने 14 वर्षीय मुलीला आरोपीने केली बेदम मारहाण; पीडित मुलगी गंभीर जखमी
शिक्षकाच्या अशा कृत्यामुळे तरुणींमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुरूने जर असा काही प्रकार केला तर कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आहे. असा गुन्हा करणाऱ्या शिक्षकांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अशीच एक घटना नालासोपा-यात (Nalasopara) घडली. ज्यात एका तरुणाने तिच्याच सोसायटीत राहणा-या 14 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली असता तिने नकार दिल्या कारणाने या तरुणाने तिचे डोके भिंतीवर आदळले