Pune: शारीरिक प्रशिक्षणादरम्यान 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक अटकेत
पुण्याच्या हद्दीतील एका शाळेत शुक्रवारी ही घटना घडली.
शारीरिक प्रशिक्षणादरम्यान (Physical training) 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) 32 वर्षीय शिक्षकाला अटक (Arrested) केली आहे. पुण्याच्या हद्दीतील एका शाळेत शुक्रवारी ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी पुणे शहरातील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, शिक्षकाने इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. हेही वाचा Chhattisgarh Crime: नवऱ्याचे मुलीशी अवैध संबंध! पत्नीने बोलवली बैठक, चपलांचा हार घालत व्यक्तीला केली मारहाण
या प्रकरणातील एफआयआर शनिवारी नोंदवण्यात आला. आम्ही 32 वर्षीय शिक्षकाला अटक केली आहे. ज्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या ठाण्याचे प्रभारी निरीक्षक म्हणाले.