टाटा पॉवर कडून महाराष्ट्रात 100 MW ऊर्जा निर्माण करणारे सोलार प्रोजेक्ट विकसित; MSEDCL कडून विशेष पत्र देऊन सन्मान
टाटा पॉवर कडून महाराष्ट्रात 100 MW ऊर्जा निर्माण करणारे सोलार प्रोजेक्ट विकसित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाकडून विशेष पत्र पाठवून कंपनीला सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात 100 मेगाव्हॅटचे (100-megawatt) सोलार प्रोजेक्ट्स (Solar Project) विकसित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (Maharashtra State Electricity Distribution) यांच्याकडून टाटा पावर रिन्यूएबल एनर्जी (Tata Power Renewable Energy) यांना सन्मापत्र पाठवण्यात आले. 100 MW ऊर्जा निर्माण करणारे सोलार प्रोजेक्ट विकसित केल्याबद्दल MSEDCL कडून विशेष पत्र देऊन सन्मान केल्याचे टाटा पॉवरकडून आज (19 जून, शुक्रवार) सांगण्यात आले आहे.
पावर पर्चेस कराराअंतर्गत ही ऊर्जा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाला (MSEDCL) पाठवण्यात येईल. हा करार 25 वर्षांसाठी व्हॅलिड असेल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये MSEDCL तर्फे झालेल्या बिडिंगमध्ये टाटा पॉवरने हा प्रोजेक्ट मिळवला होता. पॉवर पर्चेस कराराच्या तारखेपासून 18 महिन्याच्या आत हा प्रोजेक्ट पूर्ण करावा असे करारात म्हटले होते. या प्लॅंटमधून दरवर्षी 2.4 कोटी युनिट्सची एनर्जी जनरेट होणार असून 2.4 कोटी किलोचा कार्बन डायऑक्साईड जनरेट होणार आहे. (2021 पर्यंत मुंबईत 200 तर, संपूर्ण देशात 700 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे Tata Power चे लक्ष्य)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाकडून सन्मानपत्र मिळाल्यानंतर कंपनीचे सीईओ आणि मॅनेजिंग डिरेक्टर प्रवीर सिन्हा यांनी सांगितले की, "कंपनीच्या रिन्यूएबल एनर्जीची क्षमता 3,557 megawatt असून 2,637 megawatt एनर्जी सध्या कार्यरत आहे. तर 920 megawatt एनर्जीची इम्प्लिमेंट प्रोसेस सुरु आहे. त्यापैकी 100 megawatt एनर्जीच्या पुरवठ्याबद्दल हे सन्मानपत्र देण्यात आले आहे."
भारतामध्ये सध्या वायूऊर्जा, कोळशाद्वारे निर्माण होणारी ऊर्जा आणि सोलार ऊर्जा मिळून 3,70,348 megawatt ऊर्जेची गरज भासते. त्यापैकी सध्या भारतामध्ये सोलार ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेची क्षमता 35000 MW इतकी आहे. ही ऊर्जा भारताच्या गरजेपेक्षा 10% पेक्षाही कमी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)