दिल्लीतील मरकझ मधून आलेल्या तबलिगींना डोंबिवली मध्ये ठेवलंय? पहा मनसे आमदार राजू पाटील यांचे 'हे' ट्विट
याच पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण येथील मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी एक विशेष ट्विट केले आहे.
दिल्ली (Delhi) मधील निजामुद्दीन (Nizamuddin) येथे पार पडलेल्या मरकझ मध्ये उपस्थित तबलिगी समाजातील (Tablighi) काहींना आता डोंबिवली (Dombivli) येथील पाथर्ली (Patharli) भागात BSUP मध्ये ठेवण्यात आल्याच्या चर्चा आहेत. अगोदरच डोंबिवली हे कोरोनाचे हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot) बनले असताना या तबलिगींचे वास्तव्य हे स्थानिक नागिकांसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण येथील मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी एक विशेष ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी तबलिगींना ठेवण्यात आल्याच्या चर्चांचा दाखला देत तबलिगींना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवण्यात यावं” अशी विनंती केली आहे. COVID 19 रुग्णांच्या उपचारासाठी मनसे आमदार राजू पाटील यांचे महत्वाचे योगदान; KDMC कडे सोपवले खाजगी रुग्णालय
“डोंबिवलीतील पाथर्ली या ठिकाणी BSUP मध्ये काही तबलिगींना ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. डोंबिवली हा आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट आहे त्यामुळे तबलिगींना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवण्यात यावं” असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हंटले आहे. “डोंबिवलीत तबलिगींची उपस्थिती आहे ही बाब डोंबिवलीकरांमध्ये भीती निर्माण करू शकते त्यामुळे या तबलिगींची इतरत्र सोय करावी अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केलं आहे.
राजू पाटील ट्विट
दरम्यान, कल्याण डोंबिवलीमधील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही सध्या संख्या 84 च्या पुढे गेली आहे. यात 2 जणांचा मृत्यूही झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने या क्षेत्रातील काही भाग हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दुसरीकडे, आज सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यात नवे 472 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 4676 इतकी झाली आहे.