Swachh Sarvekshan 2020 मध्ये BMC कडून वरळी ला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कार घोषित
स्वच्छता सर्वेक्षण 2020 (Swachh Sarvekshan 2020) च्या अहवालानुसार मुंबई (Mumbai) तील G-South वार्ड म्हणजेच वरळीला (Worli) सर्वात स्वच्छ वार्ड (Cleanest Ward) चा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे
स्वच्छता सर्वेक्षण 2020 (Swachh Sarvekshan 2020) च्या अहवालानुसार मुंबई (Mumbai) तील G-South वार्ड म्हणजेच वरळीला (Worli) सर्वात स्वच्छ वार्ड (Cleanest Ward) चा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. नवनिर्वाचित पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये याच मतदारसंघातून विजय मिळवत विधानभवनात प्रवेश निश्चित केला होता, त्यांनतर अवघ्या काहीच महिन्यात वरळीला मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कामाची पोचपावती म्हणता येईल. काल, मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) स्वच्छता अभियानात यंदा मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्था व शहरांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आदित्य यांच्या सह महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) देखील उपस्थित होत्या.
प्राप्त माहितीनुसार, स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये Witty International School ला सर्वात स्वच्छ शाळेचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर, सर्वात स्वच्छ रुग्णालय म्ह्णून पी. डी. हिंदुजा रुग्णालयाला गौरवण्यात आले. याशिवाय सर्वात स्वच्छ सोसायटीचा पुरस्कार Frangipani CHS ला तसेच सर्वाधिक स्वच्छ सार्वजनिक शौचालय असा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. सर्व विजेत्यांना प्रत्येकी दीड लाखाचे बक्षीस मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे ट्विट
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या माध्यमातून मिशन स्वच्छ अभियान पूर्तीसाठी मेहनतीने काम करणार्यांना गौरवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल आणि स्वच्छतेसाठी आणि मुंबईला कचरामुक्त करण्याच्या कामात हातभार लागेल असे मत आदित्य यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.