Sushma Andhare on Devendra Fadnavis: फडणवीसांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला; दसरा मेळाव्यात सुषमा अंधारेंची सरकारवर जोरदार टीका
सध्या शेतीमालाला भाव नाही. कापसाचं काय झालं? यावर कोणी बोलत नाहीत. जातीत भांडणे लावली जात असल्याचे अंधारे म्हणाल्या.
: शिवसेना ठाकरे गटाचे दसरा मेळावा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होत आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला आहे. सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.फडणवीसांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी फडवीसांना सल्ला द्यावा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. सध्या शेतीमालाला भाव नाही. कापसाचं काय झालं? यावर कोणी बोलत नाहीत. जातीत भांडणे लावली जात असल्याचे अंधारे म्हणाल्या. (हेही वाचा - Dasara Melava 2024: दसरा मेळावा आणि राजकीय तलवारबाजी; राज्यात आज एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे,मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकांकडे लक्ष)
पाहा व्हिडिओ -
Sushama Andhare On RSS Melava: देवेंद्रजींचे कान उपटा, भाषणाच्या सुरुवातीला फडणीसांवर हल्ला#SushmaAndhare #DasaraMelava #ABPMajha #ShivSena pic.twitter.com/wiOoyke2fL
— ABP माझा (@abpmajhatv) October 12, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांनी द्वेष पसरवत भांडणं लावल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. लोकं विचारतायेत रोजगाराचे काय झाले? एमपीएससीचं काय झालं? अनेक प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं यांच्याकडे नाहीत. त्यामुळे हे असं राजकारण केलं जात आहे. कोणत्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली? असा सवाल अंधारे यांनी केला. रस्ते नाही, वीज नाही. किती लोकांना भुलवाल? कापसाचं काय झालं? आर्थिक प्रश्नांवर ते बोलतच नाहीत असे अंधारे म्हणाल्या. या सभेत सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही जोरदार टिका केली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2024 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

