Sushil Kumar Shinde: सुशीलकुमार शिंदेंकडून कॉंग्रेसला घरचा आहेर म्हणाले कॉंग्रेस पक्षातील लोक कटकारस्थानी

कॉंग्रेस पक्षातील लोकांनी कट कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन काढले मात्र तेव्हापासून आजपर्यंत कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला असं वक्तव्य करत सुशील कुमार शिंदे यांनी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला आहे.

Sushil Kumar Shinde (Photo Credits: PTI)

गेल्या काही काळीत फक्त महाराष्ट्रातचं (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात कॉंग्रेसमध्ये (Congress) मोठी गळती लागली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकलाय तर काहींनी कॉंग्रेसमध्ये (Congress) असुनही स्वत:च्या पक्षातील धोरणावर सडकून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पृथ्वीराज चौहान (Prithviraj Chauhan) कॉंग्रेस (congress) सोडणार अशा चर्चांना उधाण आलं होत त्यापाठोपाठचं आता कॉंग्रेसचे (congress) बडे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी सुशिलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. कॉंग्रेस पक्षातील लोकांनी कट कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन काढले मात्र तेव्हापासून आजपर्यंत कॉंग्रेसला (Congress) पराभव पत्करावा लागला असं वक्तव्य करत सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी  कॉंग्रेसच्या (Congress) पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला आहे.

 

तसेच स्वत: मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून महाराष्ट्रात (Maharashtra) कार्यरत असताना घेतलेल्या काही निर्णयांबाबतही त्यांनी खुलासा केला. महाराष्ट्रात कॉंग्रेसचं सरकार (Maharashtra Congress Government) असताना राज्यात गुजराती (Gujrati) समाजाला विशेष आरक्षण (Reservation) देण्यात आलं होत. यांवर सुशिलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) म्हणाले माझा जावई गुजराती असल्याने मी गुजराती समाजाला आरक्षण (Gujarati Reservation) दिलं. हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो पण आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरू लागले आहेत अशी खंत सुशील कुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) व्यक्त केली. (हे ही वाचा:- Raj Thackeray on Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्प गेलाच कसा? नेमकी काय बोलणी झाली? चौकशी करा; राज ठाकरे यांची मागणी)

 

सोलापुरात (Solapur) महाराष्ट्र गुजराती समाज (Maharashtra Gujarati Community) महामंडळाचा आज विशेष सोहळा पार पडला. दरम्यान सुशिल कुमार शिंदेंना (Sushil Kumar Shinde भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या सत्कारात गुजराती समाजाला संबोधित करताना सुशिलकुमार शिंदे यांनी मनातील खंत व्यक्त केली. तर सुशीलकुमारांनी कॉंग्रेस (Congress) विरोधी केलेल्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.