Sushma Andhare Letter: हक्कभंग प्रस्तावावरुन सुषमा अंधारेंचे निलम गोऱ्हेंना पत्र, माफी न मागण्यावर ठाम
ज्यामध्ये त्यांनी माफी मागणार नसल्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर विधानसभेच्या उप सभापती निलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सुषमा अंधारेंच्या हक्कभंगाचा प्रस्तावही मांडला होता. यावर सुषमा अंधारे यांनी 8 दिवसात माफीचे पत्र दिले नाही तर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यास परवानगी देऊ, असा इशारा निलम गोऱ्हे यांनी दिला होता. या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी माफी मागणार नसल्याचा इरादा स्पष्ट केला आहे. (हेही वाचा - Neelam Gorhe: सुषमा अंधारे आल्यामुळे नाराज? नीलम गोऱ्हेंची खोचक प्रतिक्रिया सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही)
सुषमा अंधारेंचे पत्र
"प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे."
"व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते..." असे सुषमा अंधारे म्हणाल्यात.