Supriya Sule’s Phone Hacked: खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणी पुणे पोलिसांकडून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच त्यांच्या सोबत असणार्‍या पक्ष कार्यकर्त्या आदिती नलावडे यांचा देखील फोन हॅक झाला आहे.

Supriya Sule | X

बारामतीच्या खासदार आणि शरदचंद्र पवार एनसीपी पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणामध्ये (WhatsApp Hack Case)  पुणे पोलिसांनी (Pune Police) एका अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सुप्रिया सुळे यांनी X वर पोस्ट करत आपला फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं सांगितलं होतं. त्यांना कॉल अथवा मेसेज न करण्याचंही आवाहन करण्यात आलं होतं.

दरम्यान सोमवार 12 ऑगस्ट दिवशी त्यांनी आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्याकडून USD 400 ची मागणी करण्यात येत असल्याचा दावा केला. त्यांच्या टीम कडे मेसेज करून ही मागणी केल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केला आहे. टीमने पैसे देण्याचे मान्य करून हॅकर्सना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला असता हॅकर्सनी पैसे हस्तांतरित करण्यासाठी बँक खात्याचे तपशील देखील शेअर केल्याचं त्या म्हणाल्या आहेत.  Supriya Sule Phone And WhatsApp Working: सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप सुरू; पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार .

यावत पोलिस स्टेशन मधील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून Information Technology Act अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सध्या या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच त्यांच्या सोबत असणार्‍या पक्ष कार्यकर्त्या आदिती नलावडे यांचा देखील फोन हॅक झाला आहे.  या फोन हॅक प्रकरणी तिच्याकडेही 10 हजारांची मागणी केली आहे.  आयकर विभाग, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांसारख्या एजन्सी सरकारच्या ताब्यात आहेत. त्यांना राजकीय विरोधकांचे फोन हॅक करण्यासाठी ॲप्लिकेशनची आवश्यकता नाही. पाळत ठेवण्याचे काही प्रकार असू शकतात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif