Supriya Sule On No Confidence Motion: भाजपा ने 9 वर्षात 9 सरकारं पाडली; अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Supriya Sule (PC- PTI)

भाजपा ने 9 वर्षात 9 सरकारं पाडली असल्याचा घणाघात आज अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केला आहे. भाजपाने महाराष्ट्रात 2 वेळेस तर मणिपूर, अरुणाचल, उत्तराखंड, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि पॉन्डेचेरी मध्ये प्रत्येकी एक वेळेस सरकार पाडलं आहे. त्यांची वृत्ती लोभी,  गर्विष्ठ असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी मणिपूर हिंसाचार  प्रकरणावर बोलताना मणिपूरचे मुख्यमंत्री N. Biren Singh यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. मणिपूर मध्ये हिंसाचारानंतर महिलांची नग्न धिंड काढली जाते, अत्याचार होतात. अशा परिस्थितीतही मोदी सरकार गप्प कसं बसू शकतं असा सवाल विचारत ' या भारताच्या मुली नाहीत का?' म्हणत भाजपाला घेरलं आहे.

भाजपाने देशात 9 वर्षात 9 सरकारं पाडली. यामध्ये अच्छे दिनची स्वप्नं दाखवली पण प्रत्यक्षात महागाई वाढली आहे. सार्‍याच जीवानावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. शेतकरी हवालदिल आहे. दूध बाहेरून मागवण्याची काय गरज काय? इथे कांदा पडून राहिला तरीही तो विकत घेतला नाही. परदेशात पाठवला नाही मग दूध विकत घेण्याची काय गरज आहे? असा उद्विग्न सवाल करत यामुळेच आमचा या सरकारवर विश्वास नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांचा घणाघात

दरम्यान मोदी सरकारच्या काळात स्त्री पुरूष समानता ते लोकशाही सार्‍याच गोष्टीत भारत पिछाडी वर गेला आहे मग अच्छे दिन आले कसले? हा प्रश्न देखील त्यांनी सरकारला केला आहे. यावेळी आपला विकासाला विरोध नाही पण जी गोर गरीबांच्या आवाक्याबाहेरील वंदे भारत ट्रेन सुरू केली ती आपल्या मतदारसंघात 3 स्थानकं असून देखील थांबत नसेल तर त्याचा काय उपयोग?  असा सवालही त्यांनी केला आहे. गरीब रथ सुरू केल्या असत्या तर किमान शेतकरी, सर्वसामान्य त्यामधून प्रवास करू शकला असता असा सवाल त्यांनी केला आहे. Shrikant Shinde Recites 'Hanuman Chalisa': खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालीसेचे पठण .

लोकसभेत आज आणि उद्या अविश्वासदर्शक प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर 10  ऑगस्ट दिवशी मोदी काय बोलणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.